रायगड : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील समुद्रात एक मोठी दुर्घटना घडली आहे (Massive Fire On Boat). किनाऱ्यापासून जवळपास ६-७ नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या राकेश गण यांच्या बोटीला अचानक आग (Massive Fire On Boat) लागली. ही बोट मासेमारी करणाऱ्यासाठी समुद्रात उतरली होती. ही घटना सकाळी ३ ते ४ च्या सुमारास घडल्याची माहिती मिळत आहे. (Massive Fire On Boat) या आगीमुळे समुद्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
बोटीवर होते १८ क्रू मेंबर्स
आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि भारतीय नौदल (Indian Navy) या दोन्ही बचाव पथकांनी धाडसाने कार्य करत तत्परता दाखविली. संपूर्ण १८ क्रू मेंबर्सला सुरक्षित बाहेर काढण्याचे कार्य यशस्वीरीत्या पार पडले आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या नंतर मासेमारी करणारा संपूर्ण समाजात काळजीचे वातावरण आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून बोटीचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू असून या घटनेमागील कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रायगड पोलिस अधीक्षकांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. तसेच, समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांसाठी ही एक गंभीर इशारासुद्धा आहे.