नागपूर : महालसारख्या गजबजलेल्या परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी (Photography Ban In Sangh Headquarter) शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी कडक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, संघ मुख्यालय आणि त्याच्या परिसरात फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरणास बंदी घालण्यात (Photography Ban In Sangh Headquarter) आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. (Photography Ban In Sangh Headquarter)
संघाचे मुख्यालय नागपुरात असल्याने या शहराला विशेष महत्त्व आहे. हे मुख्यालय महालसारख्या गर्दीच्या ठिकाणी स्थित आहे, जिथे हॉटेल्स, लॉज, शिकवणी वर्ग आणि विविध आस्थापने असल्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत कोणत्याही अनोळखी व्यक्तीने फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी किंवा ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्यास संघ मुख्यालयाच्या सुरक्षेला धोका (Photography Ban In Sangh Headquarter) निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलिस आयुक्तांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 (1) (3) अंतर्गत त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर करून महाल येथील संघ मुख्यालय, त्याच्या लगतच्या रस्त्यांमध्ये आणि संपूर्ण परिसरात फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास बंदी (Photography Ban In Sangh Headquarter) घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे (Photography Ban In Sangh Headquarter). हा आदेश 26 फेब्रुवारी 2025 ते 26 एप्रिल 2025 पर्यंत लागू राहणार आहे.