Baba Ramdev योगगुरू रामदेव बाबा अडचणीत ! अजामीनपात्र वॉरंट जारी, बालकृष्ण यांनाही धक्का

03 Feb 2025 15:45:24

                               ram
 
पलक्कड : योगगुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. केरळमधील (Keral) एका न्यायालयाने रामदेव बाबा (Baba Ramdev) विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. रामदेव बाबांसोबत (Baba Ramdev) पतंजलि योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण (Acharya Balakrishna) यांच्याविरोधातही वॉरंट जारी करण्यात आलेय. पलक्कड जिल्हा कोर्टाने (Palakkad District Court) दोघांविरोधात हे वॉरंट जारी केले असून सुनावणीला उपस्थित न राहिल्याने कारवाई करण्यात आली आहे. केरळच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरने (Kerala Drugs Inspector) दिव्य फार्मसी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.
 
न्यायालयाने दोघांनाही १५ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या आधी दोघांना कोर्टाने १ फेब्रुवारीला जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मात्र तरीही दोघे न्यायालयात हजर झाले नाही. दिव्य फार्मसीकडून संभ्रम निर्माण करणाऱ्या जाहिराती प्रसारीत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी केरळ ड्रग्ज इन्स्पेक्टरने (Kerala Drugs Inspector) कारवाई केलीय.
 
 
 योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि पतंजलि आयुर्वेद लिमिटेडवर (Patanjali Ayurveda Limited) अनेक गुन्हे दाखल आहेत. यात खोट्या जाहिराती, अवमान, ट्रेडमार्क उल्लंघन यांचा समावेश आहे. या प्रकऱणी सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा (Baba Ramdev) आणि पतंजलिला (Patanjali) दिलासा दिला आहे. मात्र न्यायालयाने इशारा दिला होता की, जर पुन्हा न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले तर शिक्षा होऊ शकते.
 
सर्वोच्च न्यायालयाने माफीनामा स्वीकारला
 
पंतजलिच्या (Patanjali) खोट्या जाहिराती प्रकऱणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि पतंजलि आयुर्वेद लिमिटेडचा (Patanjali Ayurveda Limited) माफीनामा स्वीकारला होता. या प्रकरणातील अब्रुनुकसानीचं प्रकरण बंद करण्यात आले होते. पण पतंजलिच्या कापराच्या उत्पादन विक्रीवर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पतंजलिवर चार कोटी रुपयांचा दंड केला होता. कोरोना बरा करण्याचा दावा, मॉडर्न मेडिसिनला बेकार म्हणल्या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशननं बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर आरोप केले होते.
Powered By Sangraha 9.0