Japanese Movie In Parliament संसद भवनात प्रदर्शित होणार रामायणाचा जपानी अनिमेशन अवतार ! १५ तारखेला खास स्क्रीनिंग

Top Trending News    03-Feb-2025
Total Views |

                                   parlaiment
 
दिल्ली : संसद भवनात (Parliament House) आधीच अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता संसदेत जपानी चित्रपट (Japanese Movie In Parliament) दाखवला जाणार आहे. हा चित्रपट आजचा नाही. संसदेत हा जपानी चित्रपट (Japanese Movie In Parliament) प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. लवकरच, हा चित्रपट पहिल्यांदाच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. संसदेत प्रदर्शित हा जपानी चित्रपट (Japanese Movie In Parliament ) भगवान राम आणि त्यांच्या जीवनावर आधारित आहे. जपानी-भारतीय अनिमेशन चित्रपट रामायण: द लेजेंड ऑफ प्रिन्स राम (Ramayana : The Legend of Prince Rama) या चित्रपटाचे प्रदर्शन १५ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान (Budget session) होईल. चित्रपट वितरण कंपनी गीक पिक्चर्सने (Geek Pictures) रविवारी ही माहिती दिली.
 
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसद सदस्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष निमंत्रित व्यक्ती देखील चित्रपटाच्या प्रदर्शनाला उपस्थित राहतील, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. गीक पिक्चर्सचे सह-संस्थापक अर्जुन अग्रवाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हे केवळ एका चित्रपटाचे प्रदर्शन नाही तर आपल्या समृद्ध वारशाचा आणि रामायणाच्या कालातीत कथेचा उत्सव आहे, जी आपल्याला प्रेरणा देते आणि मार्गदर्शन करते.
 
 
१९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता हा चित्रपट
 
'रामायण: द लेजेंड ऑफ प्रिन्स राम' (Ramayana : The Legend of Prince Rama) हा चित्रपट २४ जानेवारी रोजी मूळ इंग्रजी आवृत्तीसह हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत एकाच वेळी प्रदर्शित झाला. हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता. तथापि, अधिक थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. 'रामायण: द लेजेंड ऑफ प्रिन्स राम' (Ramayana : The Legend of Prince Rama) हे चित्रपट युगो साको, राम मोहन आणि कोइची सासाकी यांनी दिग्दर्शित केले आहे. १९९3 मध्ये भारतात २४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, परंतु तो थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला टीव्ही चॅनेलवर त्याचे पुनर्प्रसारण झाल्यानंतर ते भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले.