T-20 India Vs England टीम इंडियाचा महाविजय, अभिषेकची वादळी खेळी ! इंग्लंडवर 4-1 ने मात

Top Trending News    03-Feb-2025
Total Views |

                               t 20 
 
मुंबई - भारताने टी-20 (T-20 India Vs England) मालिकेत इंग्लंडचा (England) दणदणीत पराभव केला. रविवारी वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) झालेल्या (T-20 India Vs England) मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना टीम इंडियाने तब्बल 150 धावांनी जिंकला. भारताने (India) ही मालिका 4-1 ने खिशात घातली. या टी-20 (T-20 India Vs England) मालिकेत सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) मुंबईत टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली. त्याने दमदार शतकाव्यतिरिक्त 2 विकेट्सही घेतल्या. या सामन्यात अभिषेकने अनेक विक्रम मोडले.
 
इंग्लंडचा (England) कर्णधार जोस बटलरने (Captain Jos Buttler) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, भारतीय फलंदाज प्रथम फलंदाजी करण्यासाठी आले आणि त्यांनी धमाकेदार सुरुवात केली. भारतीय फलंदाजांनी स्फोटक खेळी करत 247 धावांचा डोंगर उभारला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) वादळी 135 धावांची खेळी खेळली. शिवम दुबेने (Shivam Dubey) 30 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा (England) संघ भारतीय गोलंदाजांपुढे नतमस्तक झाला. इंग्लंडला (England) केवळ 97 धावांपर्यंतच मजल मारता आली.
 
अभिषेक शर्माच्या अविश्वसनीय खेळी 54 चेंडूंत 135 धावा
 
अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. त्याने केवळ 54 चेंडूंचा सामना करत 135 धावा केल्या. अभिषेकच्या या खेळीत 7 चौकार आणि 13 षटकारांचा समावेश होता. शिवम दुबेने 13 चेंडूत 30 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. अशाप्रकारे, भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 247 धावा केल्या. सलामीवीर संजू सॅमसन (Sanju Samson)16 धावा करून बाद झाला. तिलक वर्मा (Tilak Verma) 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पुन्हा अपयशी ठरला. तो केवळ 2 धावांवर बाद झाला.
 
इंग्लंड केवळ 97 धावांवर ऑलआऊट
 
भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. इंग्लंडचा (England) संघ 10.3 षटकांत फक्त 97 धावांवर ऑलआउट झाला. यादरम्यान, फिलिप सॉल्टने (Philip Salt) अर्धशतक झळकावले. त्याने 23 चेंडूंचा सामना करत 55 धावा केल्या. सॉल्टने 7 चौकार आणि 3 षटकार मारले. जेकब बेथेल 10 धावा करून बाद झाला. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त, इतर कोणालाही दुहेरी अंकाचा टप्पा गाठता आला नाही.