दिल्ली - विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'भारताला बदनाम करण्याचा ठेका घेतला आहे', असा आरोप भाजप खासदार राजकुमार चहर (Rajkumar Chahar) यांनी मंगळवारी लोकसभेत केला. ते म्हणाले की, राहुल गांधींनी (Rahul Gandhi) देशाला बदनाम करण्याचा ठेका घेतला आहे. जेव्हा ते परदेशात जातात तेव्हा ते भारताचा अपमान करतात आणि संसदेत बोलतानाही ते भारताची बदनामी करतात. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) सुधारतील असे वाटत होते, पण तसे झाले नाही. त्यांनी दावा केला की राहुल गांधींनी (Rahul Gandhi) कनिष्ठ सभागृहातील भाषणात 34 वेळा चीनचे नाव घेतले. चहर म्हणाले की, चीनशी तुमची जवळीक काय आहे ?
देशातील जनतेला जाणून घ्यायचे आहे की सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) किती वेळा चीनला गेले ? देशाला याची माहिती दिली पाहिजे. चहर यांनी असा दावा केला की राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान आणि लष्कराबद्दल काही टिप्पण्या केल्या आहेत ज्या अत्यंत लज्जास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.