Ram Lallas Darshan रामलल्लांच्या दर्शनाचा वेळ वाढला ! आरतीच्या वेळेत ट्रस्टने केले मोठे बदल

Top Trending News    06-Feb-2025
Total Views |

                                 ram lalla
 
अयोध्या : अयोध्येतील रामलल्लांच्या (RamLalla in Ayodhya) भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मंदिरात दर्शनसाठी येणाऱ्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता राम मंदिर ट्रस्टकडून (Ram Mandir Trust) दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता भक्तांना भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. पूर्वी सकाळी 7 वाजल्यापासून दर्शन मिळत असे, परंतु आता भक्तांना जास्त वेळ दर्शन घेता येणार आहे.
 
 
राम मंदिर ट्रस्टने (Ram Mandir Trust) सांगितले की, आता मंगला आरती पहाटे 4:00 वाजता होईल, जी दिवसाची पहिली आरती असेल आणि त्यानंतर मंदिराचे दरवाजे काही काळासाठी बंद केले जातील. यानंतर सकाळी 6:00 वाजता शृंगार आरती होईल, त्यानंतर राम मंदिर सामान्य भाविकांसाठी उघडले जाईल.
 
याचबरोबर, मंदिरात दुपारी 12:00 वाजता राज भोगाची वेळ असणार आहे. यावेळी रामलल्लांना नैवेद्य अर्पण केला जाईल, परंतु या काळातही भक्तांना रामलल्लांचे (RamLalla) दर्शन घेता येईल. संध्याकाळी 7:00 वाजता आरती होईल, यावेळी मंदिराचे दरवाजे 15 मिनिटांसाठी बंद राहतील, परंतु दर्शनाची व्यवस्था कायम राहील. यानंतर रात्री 10:00 वाजता शयन आरती होईल, त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातील.