Shatrughan Sinha संपूर्ण देशात 'मासांहारा'वर बंदीची खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची आक्रमक मागणी

Top Trending News    06-Feb-2025
Total Views |

                                  sinha 
 
दिल्ली - आपल्या बेधडक विधानांनी कायम चर्चेत राहणारे ज्येष्ठ अभिनेते आणि तृणमूलचे खासदार शत्रुघ्न सिन्हा ( Shatrughan Sinha) यांनी मंगळवारी समान नागरी कायद्याचे कौतुक केले. त्याशिवाय देशभरात मासांहाराच्या खाण्यावर बंदी (Ban on eating meat) आणावी, अशी मागणीही केली आहे. ना केवळ बीफ (Beef) तर मासांहार खाण्यावरच देशात बंदी लावायला हवी. सरकारने अनेक ठिकाणी बीफ (Beef) बंदी आणली आहे. परंतु, काही ठिकाणी आजही उघडपणे बीफ (Beef) खाल्ले जाते, उत्तर भारतात हे नाही असे खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी म्हटले आहे.
 
 
समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) पत्रकारांनी शत्रुघ्न सिन्हा यांना प्रश्न विचारला होता. गुजरातमध्ये युसीसी लागू करण्यासाठी समिती बनवण्यात आली आहे. त्यावर शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) म्हणाले की, उत्तराखंडमध्ये हा कायदा लागू झाला तो कौतुकास्पद आहे. यूनिफॉर्म सिविल कोड असायलाच हवे, कुठल्याही देशात ते हवेत. देशातील जनतेलाही तेच वाटते. मात्र, यूसीसी अंतर्गत अनेक पेच आहेत ते दूर केले जावेत. समान नागरी कायद्यात (Uniform Civil Code) अनेक घटकांची काळजी घ्यायला हवी. तुम्ही केवळ मतांसाठी हे लागू करताय, असे वाटायला नको असं त्यांनी सांगितले.
 
तर बीफ (Beef) बॅनचा मुद्दा उचलताना अनेक ठिकाणी बीफ बंदी आहे ते योग्यच आहे. मला विचाराल तर बीफ (Beef) बंदी योग्य आहे आणि बीफ (Beef) बंदीच का, संपूर्ण देशात नॉनवेजवर बंदी आणायला हवी, असं माझे मत आहे. काही ठिकाणी बीफ बॅन आहे तर काही ठिकाणा नाही. पूर्वोत्तर राज्यात काय आहे. नॉर्थ इंडियात मम्मी आणि नॉर्थ ईस्टमध्ये यम्मी ही निती चालणार नाही, असे सांगत खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी मासांहार बंदीवर भाष्य केले.