मुंबई : जागतिक कमकुवत संकेत आणि ट्रेड वॉरच्या धास्तीने भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण (Big fall In Stock Market) झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्विकारल्यानंतर घेतलेल्या निर्णयांमुळे ट्रेड वॉरची भीती आणि अमेरिकेच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेने गुंतवणूकदारांना हादरवून सोडले (Big fall In Stock Market) आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफबाबतच्या रोजच्या नव्या वक्तव्याचे तीव्र पडसाद व एनव्हीडियाचे अपेक्षेपेक्षा कमी निकाल यामुळे आशियाईसह भारतीय गुंतवणूकदारांनी धसका घेतल्याचे (Big fall In Stock Market) दिसून आले.
यामुळे सेन्सेक्स शुक्रवारी 1,414 अंकांनी म्हणजेच 1.90 टक्के घसरून 73,198 वर बंद झाला (Big fall In Stock Market). तर निफ्टी 50 निर्देशांक 420 अंकांच्या म्हणजेच 1.80 टक्के घसरणीसह 22,124 वर बंद झाला. सर्व 13 प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल शुक्रवारी 384.28 लाख कोटी रुपयांवर घसरले (Big fall In Stock Market), जे मागील व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 393.10 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8.82 लाख कोटी रुपयांची घट झाली.
निफ्टीची 1996 नंतरची सर्वात मोठी घसरण
निफ्टीने 29 वर्षांतील घसरणीचा नवा विक्रम रचला (Big fall In Stock Market) आहे. निफ्टी 1996 नंतर सलग पाचव्या महिन्यात घसरणीसह बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, सर्वाधिक फटका निफ्टी आयटीला बसला. निफ्टी आयटी निर्देशांक 4.1 टक्के घसरून बंद झाला. बीएसई मिडकॅप 2.1 टक्के आणि स्मॉलकॅप 2.3 टक्के घसरला.
30 पैकी 29 शेअर्स लाल रंगात बंद
आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात झालेली घसरण (Big fall In Stock Market) इतकी तीव्र होती की सेन्सेक्समधील 30 पैकी 29 शेअर्स लाल रंगात बंद झाले. यामध्येही इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वाधिक 7.02 टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा (एमअँडएम) आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 4.18 टक्क्यांवरून 6.38 टक्क्यांची घसरण दिसून आली. दुसरीकडे सेन्सेक्समधील फक्त एकच शेअर एचडीएफसी बँक 1.79 टक्क्यांनी वाढून बंद झाला.
आशियाई बाजाराही घसरला
आशियाई बाजारातही घसरण पाहायला मिळाली. ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क (Big fall In Stock Market) करण्याच्या निर्णयानंतर हाँगकाँगमधील बाजारात प्रॉफिट बुकिंग दिसून आले. हाँगकाँगचा बेंचमार्क हँगसेंग 2 टक्क्यांहून अधिक घसरला. चीनमधील बाजारातही घसरण राहिली.
रुपया 28 पैशांनी गडगडला
अमेरिकन चलनात वाढ आणि देशांतर्गत शेअर बाजारातील नकारात्मक कल यामुळे शुक्रवारी रुपया 28 पैशांनी कमकुवत (Big fall In Stock Market) होऊन 87.46 (तात्पुरता) वर बंद झाला. अमेरिकेने अनेक देशांवर कर लादल्याने वित्तीय बाजारपेठेत अशांतता (Big fall In Stock Market) निर्माण झाली आहे. याशिवाय, जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे, अमेरिकन डॉलर निर्देशांकातही अस्थिरता असल्याचे परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले.