नागपूर : मनसर टेकडीच्या (Secrets Mansar Hill) आत एक प्राचीन बौद्ध स्तूप आणि तलाव असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही टेकडी वाकाटक आणि सातवाहन कालखंडातील महत्त्वाचा पुरातत्त्वीय ठेवा असू शकतो. मनसर टेकडीचे रहस्य (Secrets Mansar Hill) उलगडण्यासाठी पुरातत्व विभागाने तांत्रिक पद्धतीने उत्खनन करून संशोधन करावे (Secrets Mansar Hill), अशी मागणी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केली आहे. रामटेक येथील बोधीसत्व नागार्जुन बुद्ध महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
बोधिसत्व नागार्जुन आयुर्वेद आणि रसायनाचे जनक होते. त्यांनी आयुर्वेदासंबंधी अनेक शोधकार्य केले (Secrets Mansar Hill). या टेकडीवर आजही आयुर्वेदीक वनौषधी आहेत. टेकडीखाली बौद्ध स्तूप असून पूर्वी तो स्पष्ट दिसत असे, मात्र अलीकडे परिसरात झाडी वाढल्याने तो अदृश्य झाला आहे. तसेच, टेकडीच्या लांबी-रुंदीचा शोध घेऊन आत काय दडले आहे, याचा खुलासा करावा. पुरातत्व विभागाने योग्य त्या तांत्रिक साधनांच्या मदतीने संशोधन केल्यास येथे पर्यटक आणि संशोधकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते, असेही ते म्हणाले.
बोधिसत्व नागार्जुन बुद्ध महोत्सवात विदर्भातील हजारो बौद्ध अनुयायी पांढऱ्या वस्त्रात सहभागी झाले होते. पंचशील ध्वजांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. हजारो बांधवांची वर्दळ असल्याने पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. प्रारंभी ससाई आणि भिक्खू संघाने परित्राण पाठ घेतला. यानंतर नागार्जुनाचा प्राचिन इतिहासाची माहिती दिली.