Cement Revolution कर्नाटकात मोठी गुंतवणूक ! 75 दशलक्ष टन सिमेंट उत्पादनाचा महत्त्वाकांक्षी लक्ष्य

10 Mar 2025 14:41:08

dalmia
 
मुंबई :  Cement Revolution भारतातील आघाडीवरील सिमेंट कंपन्यांपैकी एक असलेली दालमिया भारत लिमिटेडने आपल्या सहयोगी कंपन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 3,520 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतभर विस्तार करण्याच्या उद्दिष्टाने आणि 2028 पर्यंत 75 दशलक्ष टन सिमेंट उत्पादनाचे Cement Revolution लक्ष गाठण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
2031 पर्यंत 110-130 दशलक्ष टन क्षमतेचे ध्येय कंपनीने ठेवले आहे. कंपनी कर्नाटकमधील बेळगाव प्लांटमध्ये 3.6 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमतेचा क्लिंकर युनिट आणि 3 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमतेचा ग्राइंडिंग युनिट उभारणार आहे. तसेच, महाराष्ट्रातील पुण्यात 3 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमतेचे नवीन ग्राइंडिंग युनिट उभारणार आहे. कर्ज आणि कंपनीच्या नफ्यातून ही गुंतवणूक केली जाणार आहे. हा उत्पादन विस्तार आणि आसाम, बिहारमध्ये सुरु असलेला 2.9 दशलक्ष टन उत्पादन क्षमता विस्तार बघता दालमियाची एकूण सिमेंट उत्पादन क्षमता Cement Revolution 55.5 दशलक्ष टन प्रति वर्ष पर्यंत पोहोचेल. हे नवीन प्रकल्प 2027 आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.


Powered By Sangraha 9.0