चंद्रपूर : Judicial Custody येथील रामनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले असता त्याने जामिनाची विनवणी करूनही गुन्हेगारी क्षेत्रातील ‘जल्लाद’ नावाने प्रसिध्द असलेल्या आरोपीची न्यायाधिशांनी जामीन अर्ज फेटाळत न्यायालयीन कोठडीत Judicial Custody रवानगी केली. जल्लाद ऊर्फ आशिष अक्रम शेख (21) रा. फुकटनगर, चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.
रामनगर पोलिस ठाण्यामध्ये घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीला रविवारी जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर रिमांड कामी हजर करण्यात आले होते. फिर्यादीच्या घरातील सोने व चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल चोरीचा 53 हजार 500 चोरी केल्याचे संशयावरून पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनी जामिनासाठी विनवणी केली. मात्र त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता न्यायाधिशांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत Judicial Custody करण्याचा निर्णय दिला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाचे वतीने ‘जल्लाद’ यांस मोफत विधी सेवा पुरविण्यात येत आहे.
अटकेत असलेल्या व्यक्तीला देखील संविधानिक अधिकार असतात. ‘जल्लाद’ ची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयीन कोठडीत Judicial Custody रवानगी करण्यात येत असल्याने त्याच्या वतीने जामिनाचा अर्ज दाखल केला. जरी तो सराईत गुन्हेगार असला तरी त्याला जामीनाचा अधिकार आहे. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने संबंधित गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांचे म्हणणे मागविण्यात यावे असा आदेश केला. त्यामुळे ‘जल्लाद’ची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली.