Shiv Nadar HCL शिव नाडर यांचा मास्टरस्ट्रोक ! मुलीला 47% हिस्सा देत दिली एचसीएलची जबाबदारी

Top Trending News    10-Mar-2025
Total Views |

shiv n
 
दिल्ली : एचसीएलचे संस्थापक अब्जाधीश उद्योगपती शिव नाडर Shiv Nadar HCL यांनी एचसीएल कॉर्प आणि वामा दिल्लीमधील त्यांची 47% हिस्सेदारी त्यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्राला भेट म्हणून दिली आहे. शिव नाडर Shiv Nadar HCL यांनी 6 मार्च रोजी हे ट्रांसफर केले. हे पाऊल धोरणात्मक उत्तराधिकार योजनेचा एक भाग आहे. या हस्तांतरणानंतर, रोशनी वामा दिल्ली आणि एचसीएल कॉर्प च्या प्रमुख भागधारक बनतील. गिफ्ट डीड करण्यापूर्वी, शिव आणि रोशनी यांचे वामा दिल्ली आणि एचसीएल कॉर्पमध्ये अनुक्रमे 51% आणि 10.33% हिस्सेदारी होती.
 
 
Shiv Nadar HCL वडिलांकडून भेट मिळाल्यानंतर, रोशनी यांचा कंपनीतील हिस्सा सुमारे 35% पर्यंत वाढेल. कंपनीतील कुटुंब नेतृत्व मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. रोशनी ही एचसीएल टेकची अध्यक्षा आहे. रोशनी नाडर यांनी केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
 
रोशनी वयाच्या 28 व्या वर्षी कंपनीच्या सीईओ बनल्या
 
43 वर्षीय रोशनी नाडर मल्होत्रा एचसीएल कॉर्पोरेशनच्या कार्यकारी आणि सीईओ देखील राहिल्या आहेत. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्या कंपनीच्या सीईओ झाल्या. याशिवाय, त्या एचसीएल टेक्नॉलॉजीज बोर्डाच्या उपाध्यक्षा आणि शिव नाडर Shiv Nadar HCL फाउंडेशनच्या विश्वस्त देखील राहिल्या आहेत.