Dhanorkar VS Vadettiwar विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा ! धानोरकरांमुळेच विदर्भात काँग्रेसला फटका ?

11 Mar 2025 13:54:27

dhanor
 
मुंबई : Dhanorkar VS Vadettiwar विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेसचेच नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. आता, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर गंभीर Dhanorkar VS Vadettiwar आरोप केले आहे. धानोरकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जे वक्तव्य केले, त्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका पडला. काँग्रेस विरोधात विदर्भातील गैर कुणबी, ओबीसी एकवटला आणि त्यांनी भाजपाला मतदान केल्याने विदर्भात 40 जागा जिंकण्याची शक्यता असलेली काँग्रेस केवळ 10 जागांवर आली, असा खळबळजनक दावाही वडेट्टीवार Dhanorkar VS Vadettiwar यांनी केला आहे.
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी येथील कुणबी समाज संमेलनात केलेल्या वक्तव्याचा वडेट्टीवारांनी Dhanorkar VS Vadettiwar संदर्भ देत भाष्य केले. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात फक्त कुणबी उमेदवार निवडून द्या, अल्पसंख्याक समाजातील आमदार नको, असे म्हणत धानोरकर यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवारांना पराभूत Dhanorkar VS Vadettiwar करण्याचे आवाहन केले होते. मात्र, ब्रह्मपुरीत केलेल्या वक्तव्यामुळे विदर्भातला गैर कुणबी ओबीसी मतदार एकवटले आणि ते भाजपाकडे गेल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या मते कुणबी समाज सर्वच पक्षात आहे. विधानसभा निवडणुकीत तो ज्या पक्षात होता त्याच पक्षात राहिला. मात्र, धानोरकर यांच्या वक्तव्यामुळे कुणबी सोडून इतर ओबीसी समाज एकवटला आणि तो भाजपाकडे गेला. त्यामुळे आम्हाला विदर्भात 40 जागा मिळण्याची शक्यता असतानाही केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले. अगदी नाना पटोले यांची जागाही या वक्तव्यामुळे धोक्यात आली, असा दावाही त्यांनी केला.
 

काय म्हणाल्या होत्या धानोरकर ?
 
अल्पसंख्याक समाजातील लोक आपले प्रतिनिधित्व करत आहेत. आता ही परंपरा बदलली पाहिजे, मॅनेज होऊ नका. पक्ष कुठलाही असला तरी कुणबी समाजाच्या उमेदवाराला निवडून द्या, असे म्हणत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना पराभूत करण्याचे Dhanorkar VS Vadettiwar आवाहन केले होते. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात कुणबी समाजाचे महाअधिवेशन पार पडले. त्या वेळी त्यांनी बोलताना हे वक्तव्य केले होते.
 
जेवढी ज्याची टक्केवारी तेवढी त्याची हिस्सेदारी
 
धानोरकर पुढे म्हणाल्या, ब्रम्हपुरी किंवा गडचिरोलीत अल्पसंख्याक समाजाचे लोक आपले प्रतिनिधीत्व करत आहेत. ही परंपरा आता बदलली पाहिजे. जेवढी ज्याची टक्केवारी तेवढी त्याची हिस्सेदारी असायला हवी. आता वेळ आली आहे. आपण आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे. आपल्या जिल्ह्यात एखाद्याने खोटी आश्वासने दिली की, आपले लोक मॅनेज होतात. कुठेतरी आपण हे थांबवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले होते. Dhanorkar VS Vadettiwar
Powered By Sangraha 9.0