Rangbhari Ekadashi 2025 काशीत रंगभरी एकादशीचा जल्लोष ! मथुरेतून आणल्या बाबा विश्वनाथांनासाठी भेटवस्तू

11 Mar 2025 14:30:38

rangbhari
 
लखनौ :  Rangbhari Ekadashi 2025 होळीनिमित्त वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याची परंपरा सुरू झाली आहे. वाराणसीमध्ये दरवर्षी होणाऱ्या तीन दिवसांच्या रंगभरी एकादशी उत्सवात, मथुरा श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर आणि सोनभद्र येथील आदिवासी भाविकांनी काशी विश्वनाथ मंदिरात भेटवस्तू अर्पण केल्या. रंगभरी एकादशीमध्ये Rangbhari Ekadashi 2025 सहभागी होण्यासाठी आलेल्या आदिवासी भाविकांना भेटवस्तू प्रदान करताना काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्व भूषण उपस्थित होते. त्यांनी माहिती दिली की यावर्षी होळीच्या निमित्ताने, रंगभरी एकादशीपूर्वी Rangbhari Ekadashi 2025, श्री काशी विश्वनाथ धाम येथील भगवान विश्वनाथ यांनी श्री कृष्ण जन्मभूमी मथुरा येथे विराजमान असलेल्या लड्डू गोपाळांना आणि श्री कृष्ण जन्मभूमी येथील भगवान लड्डू गोपाळ यांनी श्री विश्वेश्वर महादेव यांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे.
 
 
विश्व भूषण यांनी सांगितले की, काशी विश्वनाथ महादेव यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या नवोपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कृष्णजन्मभूमी मथुराचे सचिव कपिल शर्मा आणि गोपेश्वर चतुर्वेदी जी यांच्याशी चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्व भूषण म्हणाले की, दोन्ही मंदिरांच्या व्यवस्थापनाने परस्पर विनंत्या आणि प्रस्ताव ईमेलद्वारे पाठवले. Rangbhari Ekadashi 2025 रंगभरी एकादशी या सनातन नवोपक्रमांतर्गत, कृष्ण जन्मभूमी मथुरा येथून बाबा विश्वनाथांना अबीर, गुलाल, रंग इत्यादी अर्पण करण्यात आले, तर काशी विश्वनाथ धाम येथून भगवान लड्डू गोपाळांसाठी राख, अबीर-गुलाल, कपडे आणि चॉकलेट इत्यादी भेट म्हणून पाठवण्यात आले. ते म्हणाले की, कृष्ण आणि शिव भक्ती या दोन प्रमुख सनातन प्रवाहांना जोडणारा हा कार्यक्रम सनातन धर्माच्या परंपरांना अधिक समृद्ध करेल. Rangbhari Ekadashi 2025
Powered By Sangraha 9.0