वाढोणा : Vanishing Tradition होळी आली की गावात दिसणाऱ्या घाणमाकडी आता दिसेनाशा झाल्या आहेत. आजच्या पिढीला एखाद्या चित्रामध्येच किंवा ग्रामीण भागातच घानमाकडीचे Vanishing Tradition दर्शन घडत आहे. होळी सणापासून उन्हाळ्याच्या दिवसात मनोरंजनाचे साधन असलेली घाणमाकडी Vanishing Tradition दिसण्याची प्रथा दिवसेंदिवस बंद होत असून लहान मुले मोबाईमध्ये अडकलेली आहे. मोबाईलच्या व्यसनापासून मुलांना दूर ठेवायचा असेल तर अशा परंपरा जोपासण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.
साधारणत: 25 ते 30 वर्षा अगोदर घाणमाकडही Vanishing Tradition खेड्यापाड्यात मुलांचे मनोरंजनाचे प्रमुख साधने होती. उन्हाळ्यात मुलांना अभ्यासाचे टेंशन नसते, बहुतेक वेळ फावला असतो. त्याकाळी टी.व्ही. मोबाईल आजच्यासारखे नव्हते. आता मात्र, परंपरागत खेळाची जागा मोबाईलने घेतली आहे. मनोरंजन म्हणून मोबाईलचा वापर करीत असतात. त्यामुळे आता काळ बदलला आणि काळाबरोबर मनोरंजनाच्या व्याख्यासुद्धा बदलल्या. त्यांची जागा आता टीव्ही, मोबाईल यासारख्या आधुनिक साधनांनी घेतली आहे. याचाच परिणाम म्हणून होळीनंतर प्रत्येक खेड्यात दिसणारी घानमाकड आता कालबाह्य Vanishing Tradition नाही तर दिसेनाशी झाली आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच गावातील काही प्रमुख मुले एकत्र यायची. जंगलात किंवा शेतात जावून धनुष्य बाणाच्या आकाराचा लाकूड आणायचे. मधोमध त्याला एक छिद्र पाडायचे आणि गावातील चौकात एक खांब गाडून त्यावर ही घानमाकड लावायची. दिवसा एखाद्या झाडाखाली तर रात्री एखाद्या चौकात या घानमाकडींचा आवाज सुरूच असायचा. 2 बाजूला 2 बसले की, आळीपाळीने दोघे झोके द्यायचे आणि त्यांना दम भरेपर्यंत हे झोके सुरूच राहचे. दम भरल्यानंतर ते उतरायचे आणि नंतर दुसरे चढायचे. काही टारगट मुले आजूबाजूच्यांना त्रास व्हावा म्हणून कर्कश आवाज करण्यासाठी घानमाकडीच्या Vanishing Tradition छिद्रामध्ये मुद्दाम सागरगोट्या किंवा वाघनख टाकायचे.
पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये गुरांची बैठक शेतातील एखाद्या आंबराईत किंवा एखाद्या मोठ्या झाडात असायची. गुरांनी बैठक घेतली की गुराखी हटकून घानमाकडीचा खेळ खेळायचे. पण आता तेव्हढी गुरेही राहिली नाहीत आणि घानमाकडीचा खेळही उरला नाही. आजच्या पिढीला घानमाकड हा शब्द विचित्र वाटत असेल. तरी मात्र ते एक मनोरंजनाचे उत्तम साधन होते.
पारंपारिक खेळ हरविले
लहान मुलांना उन्हाळ्याच्या दिवसांत खेळण्यासाठी असलेले अनेक खेळ आता लुप्त झालेले आहेत. बदलत्या काळानुसार लहान मुलांचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत असून मोबाईल गेमकडे वळलेले आहे. त्यामुळे विटीदांडू, कंच्या, लपंडाव, लगोरी, लंगडी, चोरचिट्या, चवाष्टा, टायर फिरवणे, लोखंड साखळी, तळ्यात मळ्यात आदी खेळ समाजातून लूप्त झाल्याचे पहायला मिळत आहे. बदलत्या काळानुसार या खेळांमध्ये असलेल्या आठवणीही हरवत चाललेल्या Vanishing Tradition आहेत.