नागपूर : Safe Holi होलिकाचे पारंपरिक पद्धतीने दहन केल्यानंतर शुक्रवारी शहर आणि जिल्ह्यात रंगाची उधळण होणार आहे. जल्लोषाच्या या अतिउत्साहात अनेकजण मद्याचे अरिक्त सेवन करतात. या दिवशी दुधात थंडाई (भांग) टाकून पिणाऱ्यांची संख्याही मोठी असते. मद्य व भांग थंडाईमुळे येणाऱ्या नशेत रस्त्यांवर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडतात. शहरात वाद-विवाद वाढून हाणामारीच्या घटनांही वाढतात. मात्र रंग खेळत असताना त्वचा आणि डोळ्यांची काळजी घ्या Safe Holi, असा सल्ला तज्ज्ञांनी नागपूरकरांना दिला आहे.
रात्र जागून होळी साजरी केल्यानंतर धुळवडीचा उत्साह असतो. जुन्या काली फुलांचे रंग आणि त्यातील अर्क काढून रंग बनविला जायचा. आता काळ बदलला आणि रासायनिक रंगाला महत्त्व आले. रासायनिक रंगात विषारी घटक Safe Holi असतात. त्यामुळे डोळ्यांसह त्वचेवर गंभीर परिणाम होतो. रंग खेळताना डोळ्यांची विशेष काळजी घ्या, नव्हेतर इकोफ्रेंडली होळी साजरी करा, असा सल्ला मेडिकलचे नेत्रतज्ज्ञ डॉ. जयंत कोले यांनी दिला.
रंगातील हे घटक विषारी, धोकादायक
- मेटल ऍसिड
- अल्कली पावडर
- चमक येण्यासाठी काच पावडर
- काळ्या रंगात लेड ऑक्साडईड
- हिरव्यामध्ये कॉपर सल्फेट
- लाल रंगात मर्क्युरी सल्फेट
- काही रंगांमध्ये ऍस्बेस्टॉसची भुकटी
- चॉक पावडर
- सिलिकाचा
हे परिणाम होतात
- त्वचेवर परिणाम होतो
- डोळ्यांची जळजळ होणे
- अंधत्व येण्याची भीती
फुग्यांमध्ये रंग भरून ते अंगावर भिरकावण्याची वाईट प्रथा सुरू झाली आहे. वेगाने येणारा फुगा डोळ्यावर Safe Holi आदळल्यास कॉर्निया आणि रॅटिनाला इजा होऊ शकते. डोळा निकामी होण्याची भीतीही असते. डोळ्यांच्या संरक्षणासाठी चष्मा किंवा गॉगलचा वापरा करा. डोळ्यांच्या जवळ कोल्डक्रिम लावा. रंग पुसताना डोळे बंद करा आणि गरम पाण्याचा वापर करा.
- डॉ. जयंत कोले, नेत्ररोग तज्ज्ञ, नागपूर
त्वचा ही शरिराचे संरक्षण कवच Safe Holi आहे. त्यामुळे रंग खेळायला जाण्यापूर्वी शक्यतो शरीरावर खोबरेल तेल अथवा मॉश्चरायझरचा वापर करा. रंगातील रसायनांमुळे त्वचेवर परिणाम होऊन कोरडेपणा, खाज, खरूज, गजकर्ण होण्याची जोखीम असते. अनेकदा त्वचेवर रसायनांमुळे पुरळही येतात. त्यामुळे काळजी घ्या.
- डॉ. जयेश मुखी, विभाग प्रमुख, त्वचारोग विभाग, मेडिकल