Haryana Assembly Uproar हरियाणा विधानसभेत गदारोळ ! स्वतःला तेंडुलकर समजू नका

15 Mar 2025 14:36:01

hari
 
चंदीगड : Haryana Assembly Uproar विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार अनेक वेळा समोरासमोर आले. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा आणि कॅबिनेट मंत्री कृष्णकुमार बेदी यांच्यात वारंवार वादविवाद Haryana Assembly Uproar झाले, तर संसदीय कामकाजमंत्री महिपालसिंह धांडा आणि शहरी संस्थामंत्री विपुल गोयल यांनी काँग्रेस आमदारांच्या युक्तिवादांना प्रत्युत्तर दिले. आमदार आणि मंत्र्यांना शांत करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागला.
 
 
दोन्ही बाजूंनी फलंदाजी चालणार नाही
 
अध्यक्षांनी वारंवार विनंती केल्यानंतरही जेव्हा मंत्री आणि आमदारांमधील संघर्ष संपला नाही, तेव्हा त्यांना कठोर भूमिका घ्यावी लागली. Haryana Assembly Uproar हरविंदर कल्याण म्हणाले, दोन्ही बाजूंनी फलंदाजी चालणार नाही, कोणीही स्वतःला सचिन तेंडुलकर समजू नये. जेव्हा काँग्रेस आमदार अशोक अरोरा सभागृहात बोलत होते, तेव्हा कॅबिनेट मंत्री कृष्णा बेदी त्यांना वारंवार अडवत होते. यावर भूपेंद्रसिंह हुड्डा संतापले आणि म्हणाले, मंत्र्यांना बोलू द्या, अशोक अरोरा बसतील. Haryana Assembly Uproar
Powered By Sangraha 9.0