देहू - Bhakti Festival देहूनगरीत रविवारी संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळा Bhakti Festival संपन्न झाला. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरामधून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. टाळ-मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकोबाचा जप करीत राज्यभरातून अनेक दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्या. त्यामुळे इंद्रायणी नदीचा काठ वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला. दरम्यान, बीज सोहळ्यानिमित्त Bhakti Festival मुख्य मंदिर आणि गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा गौरव
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली असून 75 व्या बीज सोहळ्यानिमित्त Bhakti Festival एकनाथ शिंदे यांचा देहून संस्थानाकडून गौरव करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना पहिल्या संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पहार, चिपळ्या, संत तुकाराम महाराजांची मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कारानंतर एकनाथ शिंदे यांनी आयोजकांचे व सर्व वारकऱ्यांचे आभार मानले.
एकनाथ शिंदे म्हणाले, हा पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. मी खूप भाग्यवान आहे की मला हा पुरस्कार त्याच भूमीवर मिळत आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज भेटले होते. महाराष्ट्र ही संतांची व शूरविरांची भूमी Bhakti Festival आहे. महाराष्ट्राच्या संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असा शब्दही एकनाथ शिंदे यांनी दिला. पंढरपूर वारीदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Bhakti Festival यांनी वारकऱ्यांच्या सेवा-सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
काय आहे तुकाराम बीज ?
संत तुकाराम महाराजांचा Bhakti Festival जन्म देहू गावात वसंत पंचमी म्हणजेच माघ शुद्ध पंचमीला झाला. तर त्यांचे वैकुंठ-गमन फाल्गुन वद्य द्वितीयेला झाले असे मानले जाते. संत तुकाराम महाराजांना देव सदेह वैकुंठात घेऊन गेल्याची मान्यता आहे. या दिवसाला तुकाराम बीज म्हटले जाते. तुकाराम महाराजांचे Bhakti Festival वैकुंठगमन देहू (पुणे) येथे 1649 मध्ये झाले, असे वारकरी संप्रदाय मानतो. या दिवशी नांदुरकी वृक्ष (देहू येथील एक झाड) दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी हलतो, असा भक्तांचा विश्वास आहे. Bhakti Festival वारकरी संप्रदायासाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. यावेळी पंढरपूरहून आणि इतर गावांमधून मोठ्या संख्येने वारकरी देहू येथे येतात. नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, भजन आणि गाथा पारायणाचे आयोजन होते.
परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था
तुकाराम महाराजांच्या 375 व्या बीज यात्रेच्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत प्रशासनाकडून विविध कामे करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गाथा मंदिर, मुख्य मंदिर, वैकुंठस्थान मंदिर, मुख्य कमान, बीएससी केंद्रामध्ये बाह्य रुग्ण तपासणी केंद्र उभारण्यात आले असून मुबलक औषध साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर लाखो वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्य मंदिर वैकुंठ गमन स्थान मंदिर Bhakti Festival परिसर, तसेच नगरपंचायत प्रशासनाकडून सुमारे 30 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. देहूमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मार्ग बीज सोहळ्यासाठी बॅरिकेटिंग उभारून बंद करण्यात आले आहेत.