Chief Minister Announcement मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लहर !

17 Mar 2025 20:23:50

Cm
 
नागपूर - Chief Minister Announcement ग्रामीण भारताचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पक्के घरे बांधून देण्यात देशात महाराष्ट्र राज्य प्रथम स्थानावर आहे. नुकतेच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत Chief Minister Announcement राज्य सरकार 50 हजार रुपयांचे वाढीव अनुदान देणार असल्याची घोषणा Chief Minister Announcement केली आहे. राज्य सरकारने या योजनेंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 1838000 घरकुलांना मंजुरी दिली आहे. परिणामी, लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ होणार Chief Minister Announcement आहे. वाढीव अनुदानामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 9190 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण  टप्पा 1 अंतर्गत गेल्या 7 वर्षांत 1357564 उद्दिष्ट होते. त्या तुलनेत 2024-25 मध्ये टप्पा 2 साठी राज्याला 20 लाखांचे उद्दिष्ट आहे, हे विशेष.
 
Bhakti Festival देहूनगरीत भक्तिरसाची उधळण, संत तुकाराम बीज सोहळ्याचा उत्साह !  
 
प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची योजना असून, 60-40 प्रमाणात केंद्र राज्य सरकारच्या सहाय्याने ही योजना देशभरात 2016 पासून राबवित आहे. यात गेल्या 5 वर्षांपासून अनुदानात वाढ झाली नव्हती. विरोधकही हाच मुद्दा उचलून धरत असताना केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय Chief Minister Announcement इतर राज्यासाठी मार्गदर्शक तसेच लाभार्थ्यांना दिलासा देणारा ठरणार असल्याची चर्चा आहे. 2024-25 मध्ये योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले. यापैकी 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी देऊन मंजूर घरकुलांपैकी 14 लाख 71 हजार लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यासाठी 2 हजार 200 कोटी रुपये वितरितसुद्धा करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त राज्य सरकार घरकुल लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी पक्के बांधकाम झालेल्या घरकुलांवर सौर ऊर्जा संच बसविणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे.

1 एप्रिल 2016 मध्ये झाले पुर्नगठन
 
ग्रामीण भागात राहणाऱ्या देशवासीयांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी बेघरांना पक्क्या घरांमध्ये वास्तव करता यावे, या हेतुने भारत सरकारने जानेवारी 1996 मध्ये इंदिरा आवास योजना कार्यक्रम हाती घेतला Chief Minister Announcement होता. मात्र, यात अनेक त्रुट्या असल्याचे लक्षात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 1 एप्रिल 2016 मध्ये याचे पुर्नगठन करून प्रधानमंत्री आवास योजना असे नामकरण करण्यात आले. याचसोबत 2024 पर्यंत देशातील प्रत्येक बेघरांना पक्के घर देण्याचे ध्येय ठरविण्यात आले.
 
जागेसाठी सुद्धा मिळते अनुदान
 
यातील 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरीसह 14 लाख 71 हजार लाभार्थ्यांना Chief Minister Announcement पहिल्या हप्त्यासाठी 2 हजार 200 कोटी रुपये वितरित करण्यात आले. मंजूर झालेल्या लाभार्थ्यांकडे स्वमालकीची जागा नसल्यास पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत 500 चौरस फूट जागेसाठी प्रति लाभार्थी 1 लाख अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.
 
पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुलासाठी मिळत असलेले 1,30,000 रुपयांचे अनुदान आजच्या महागाईच्या काळात तुटपुंजे ठरत आहे. परिणामी, मिळत असलेल्या अनुदानात घराचे काम पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येत होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांचे हित लक्षात घेता केलेली 50 हजारांच्या अनुदानाची घोषणा नक्कीच दिलासा देणारी आहे. Chief Minister Announcement
 
-शेषराव पुरटकर, लाभार्थी, रा. सेलू, ता. हिंगणघाट, जि. वर्धा
Powered By Sangraha 9.0