Historical Blunder इतिहासाचा गोंधळ ! औरंगजेब समजून बहादूर शाह जफरांचा फोटो जाळला

17 Mar 2025 14:49:30

aurang
 
पुणे -  Historical Blunder औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी पतित पावन संघटनेच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनात आंदोलनकर्त्यांकडून मोठी चूक झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी औरंगजेबाऐवजी चक्कत मुघल बादशहा बहादूर शाह यांचा फोटो जाळला Historical Blunder. ‘पतित पावन’च्या आंदोलनातील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाल महाल चौकात औरंगजेबविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परकीय आक्रमक आणि क्रूर शासक असलेल्या औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन Historical Blunder करण्यात आले होते. मात्र, आंदोलकांकडून मोठी चूक झाली आणि त्यांनी औरंगजेबाऐवजी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याचा फोटो जाळण्यात आल्याचे पाहायला Historical Blunder मिळाले. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून, अनेक जण यावर टीका करत आहेत. तर काहींनी हा प्रकार अज्ञानातून झाल्याचे सांगितले.
 
 
अनवधानाने चूक झाल्याचे संघटनेने केले मान्य
 
दरम्यान, आमच्या कार्यकर्त्याने चुकून चुकीचा फोटो छापून आणला. आम्हाला औरंगजेबाच्या उदात्तीकरण करणाऱ्यांचा विरोध करायचा होता आणि औरंगजेबाचा फोटो जाळायचा होता, असे स्पष्टीकरण पतीत पावन संघटनेने दिले आहे. तसेच, आपल्याकडून अनवधानाने ही चूक झाल्याचेही आंदोलकांनी मान्य केले आहे.
 
बहादूर शाह जफर कोण होते ?
 
बहादूर शाह जफर हे मुघल साम्राज्याचे शेवटचे सम्राट होते. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी ब्रिटिशांविरोधात मोठी भूमिका बजावली होती. ब्रिटिशांनी त्यांना कैद करून रंगून येथे पाठवले होते. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य रंगून येथेच काढले आणि तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांचा औरंगजेबाशी कोणताही संबंध नव्हता.
 
Powered By Sangraha 9.0