Nagpur Communal Clash  नागपूर महालमध्ये तणाव ! औरंगजेबच्या कबरीवरून पेटली दंगल 

17 Mar 2025 22:13:31

car
 
नागपूर :  Nagpur Communal Clash नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.
 
नागपूरच्या महाल मध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम संघर्ष
 
नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी Nagpur Communal Clash निदर्शने केली. निदर्शना दरम्यान, बाबा ताजुद्दीनच्या चादरसह औरंगजेबाचा पुतळा जाळण्यात आला, ज्यावर अरबी भाषेत काहीतरी लिहिले होते. यामुळे मुस्लिम समुदायात असंतोष निर्माण झाला. त्यामुळे, नागपूरमध्ये दोन गटांमध्ये संघर्ष झाला.
 
Chief Minister Announcement मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लहर !  
 
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाने नागपूरमध्ये निदर्शने केली. आंदोलनादरम्यान औरंगजेबाचा पुतळा जाळण्यात आला. ज्यामध्ये बाबा ताजुद्दीन यांचे एक पत्रक देखील होते. ज्यावर अरबी भाषेत काहीतरी लिहिलेले होते. यामुळे मुस्लिम समाजात असंतोष निर्माण Nagpur Communal Clash झाला. आणि यामुळे वादाला तोंड फुटले आणि त्यामुळे प्रकरण पेटले. दोन्ही गट आक्रमक झाले आणि जाळपोळ करण्यास सुरुवात झाली.
 
नागपूरकरांनी शांतता बाळगावी - गडकरी यांचे आवाहन
 
नागपूरः नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती Nagpur Communal Clash निर्माण होणे दुर्देवी  असून, नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नागपूर हे शांतता व सौहार्दासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर आहे. या शहरात जात-पंथ-धर्म या विषयावरून वाद किंवा भांडणे होत नाहीत. आज जे काही घडले, त्यासंबंधी प्रशासन कार्यवाही करेलच. नागपूरच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता प्रस्थापित होईल यासाठी स्वतः देखील प्रयत्न करावेत, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरकरांना शांततेचे आवाहन
 
नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0