Shinde Vs Thackeray शिंदे - ठाकरे गटात राडा ! शांतता समितीत गोंधळ

17 Mar 2025 19:03:53
 
shinde
 
संगमनेर - Shinde Vs Thackeray विविध सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मिरवणुकीच्या परवानगीवरून शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटात जोरदार राडा Shinde Vs Thackeray झाला. कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. अखेर पोलिस प्रशासनाने यात हस्तक्षेप करत दोघांनाही Shinde Vs Thackeray सज्जड दम देत कायद्याच्या भाषेत सुनावल्यानंतर हा वाद निवळला. शांतता समितीच्या बैठकीत शिवजयंती मिरवणुकीसाठी दोन्ही गटांना परवानगी देण्यात आली. गेल्या दहा दिवसांपासून शहरात निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी शांतता समितीची शनिवारी (दि. 15) सकाळी साडेअकरा वाजता यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, नायब तहसीलदार कदम, नगरपरिषदेचे पंकज मुगसे, निखिल पापडेजा, अमर कतारी, सोमनाथ दिवटे, नितीन अभंग, अशोक सातपुते, गौरव डोंगरे, जावेद जहागिरदार, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, संजय क्षत्रिय, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
 
 
बैठकीत सुरुवातीला विविध विषयांवर चर्चा होत असतानाच शिवजयंती उत्सवाच्या दिवशी काढण्यात येणार्‍या मिरवणुकीवर दोन्ही शिवसेनेकडून दावा सांगण्यात आला. चर्चेतून तोडगा निघण्याऐवजी कार्यकर्त्यांत वाद वाढत गेला. आरोप-प्रत्यारोप, हमरी-तुमरी व शेवटी कार्यकर्ते पदाधिकारी थेट एकमेकांवर धावून Shinde Vs Thackeray गेले. पोलिस प्रशासनासमोरच शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट एकमेकांना भिडल्याने संतापलेल्या पोलिस उपअधीक्षक सोनवणे, पोलिस निरीक्षक देशमुख यांनी, तुमची इज्जत येथे घालवू नका, कायदा हातात घ्याल Shinde Vs Thackeray तर आम्हाला तो वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. किती वेळा आम्ही राजकीय लोकांची मनधरणी करायची, आमचीही काही जबाबदारी आहे. यापुढे वाद घालणार्‍या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत सुनावल्यानंतर वाद निवळला. बैठकीत मिरवणूक मार्ग, रस्ते, डीजे, वाहतूक, वीज आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी वेगवेगळ्या सूचना प्रशासनासमोर मांडल्या. मिरवणुकांसाठी सर्वांना परवानगी देण्याचा प्रयत्न असून, ठरवून दिलेल्या वेळेत शांततेत मिरवणुका पार पाडा. मिरवणुकासंदर्भात आयोजकांना सूचना दिल्या जातील, असे पोलिसांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0