नागपूर - Aurangzeb Tomb Controversy संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर तातडीने हटविण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल येथे निदर्शने करण्यात आली. त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हा दंडाधिकारी विपीन इटनकर यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन छत्रपती संभाजीनगर येथील क्रूर व धर्मांध औरंगजेबाची कबर Aurangzeb Tomb Controversy लवकरात लवकर हटविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली. या आंदोलनानंतरही सरकारला जाग आली नाही. तर बजरंग दल पुन्हा एकदा कारसेवा करेल आणि औरंगजेबाची कबर Aurangzeb Tomb Controversy अरबी समुद्रात ओतून देईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनादरम्यान हा ठरावही आंदोलकांनी घेतला. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे हजारो कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर दोन धार्मिक गटांत संघर्ष पेटल्यामुळे महाल मधील झेंडा चौकात तणाव निर्माण Aurangzeb Tomb Controversy झाला. दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाले. वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली. जमावाला पांगवून परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांनाही अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. काही जण ठीकठिकाणी अडकून पडले. तर काही जण जीव मुठीत घेवून घराकडे निघाले. दरम्यान पोलिस अधिकारी, अंमलदार जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत त तणावाची स्थिती असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे. परिसरात कलम 163 लागू करण्यात आले आहे.
राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद Aurangzeb Tomb Controversy सुरू आहे. नागपुरातही विहिंप आणि बजरंग दलाकडून महालच्या गांधी गेटवर शिवाजी पुतळ्यासमोर औरंगजेबाची कबर हटविण्यावरून आंदोलन करण्यात आले. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पुतळ्यासमोर औरंगजेबाचा पुतळा ठेवला. पोस्टरसोबतच पुतळ्यावर धार्मिक चादर ठेवली. त्यावर गुलाल टाकून पुतळा जाळण्यात आला. बजरंग दलाच्या या कृत्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि पाहता-पाहता तणावाची स्थिती निर्माण झाली. दुपारच्या नमाजनंतर मोठ्या संख्येत एका गटाचे लोक चौकात जमा झाले. बजरंग दलाने जाणिवपूर्वक धार्मिक भावना दुखावल्या आणि विचारपूर्वक कट-कारस्थान रचल्याचा आरोप लावला. परिसरात संतप्त जमावाची संख्या वाढतच गेली आणि परिस्थिती चिघळली.
गुप्तचर यंत्रणा ठरली कुचकामी
सायंकाळी पुन्हा तणाव होण्याचा अंदाज आधीच लावण्यात आला होता. त्यामुळे परिसरात बंदोबस्त तैनात करण्यासोबतच सर्व ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांना तयार राहण्याचे आदेश देण्यात आले होते. गांधीगेट आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी सांगितले की, दुपारीच तक्रार केल्यानंतर ते आप-आपल्या घरी गेले होते. सायंकाळी जमाव कुठून आला हे कोणालाच माहिती नाही. सांगण्यात येते की, मोमिनपुऱ्यातून अग्रसेन चौक मार्गे शेकडो लोक महाल परिसरात दाखल झाले. यावरून पोलिसांची गुप्तचर यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. इतक्या मोठ्या संख्येत लोक गोळा झाल्याने तणाव वाढला. रात्री उशिरापर्यंत पोलिस परिसरात तळ ठोकून होते. सर्व ठाण्यांतून पोलिस बळ मागवण्यात आले होते.
पोलिस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला
हिंसाचारादरम्यान पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र कुऱ्हाडीचा वार त्यांनी हाताने अडविला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. सायबर पोलिसांकडून सोशल मीडियावर गस्त सुरू आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. पोलिसांकडून परिसरातील डम्प डाटाही काढण्यात येत आहे. पोलिसांनी आयुक्तांनी सांगितले की, सध्या स्थिती नियंत्रणात असून पोलिस घटनेचा सखोल तपास करीत आहेत.