मुंबई : Protest For Farmer बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाचा 2020 चा युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येसाठी सरकार जबाबदार आहे, शेतकऱ्यांना त्वरित न्याय देण्याची मागणी करीत सोमवारी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. आत्महत्येपूर्वी युवा शेतकरी कैलास नागरे यांनी तीन पानी चिठ्ठी लिहिली असून त्यात आत्महत्येसाठी सरकार जबाबदार Protest For Farmer असल्याचे म्हटले होते. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त झाला. आता विरोधकांनीही शेतकऱ्यांना पुरस्कार नको, पाणी द्या, अशा घोषणा देत आंदोलन केले. विरोधकांच्या आंदोलनात सत्ताधारी पक्षाचे आमदार अमोल मिटकरीही सहभागी झाले. त्यांनीही शेतकऱ्यांना न्याय Protest For Farmer देण्याची मागणी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, सिंदखेडराजा मतदारसंघातील गावामधील कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. "शेती मला आहुती मागत आहे. आहुती शिवाय काही मिळत नाही", असे त्यांनी आत्महत्या पत्रात लिहिले आहे. तसेच कैलास नागरे यांना युवा शेतकरी पुरस्कार मिळाला होता. इतर तरुण शेतकऱ्यांना त्यांनी आशावाद दिला होता. गोपाळ मित्र मंडळ स्थापन केले होते. शेतकऱ्यांना मदत करत होते. 250 शेतकऱ्यांची टाऊन मोट बांधली होती. मात्र व्यवस्थेसमोर हतबल होऊन त्यांनी आत्महत्या Protest For Farmer केली, असे सिद्धार्थ खरात यांनी सांगितले.
सरकारने आश्वासन दिले होते, पण... : याचबरोबर, धरणाचा डावा कालवा चिखलीला गेला आहे. त्यातील काही भाग पाणी वळते करून 14 गावांना देण्याची मागणी होती. त्या तरुण शेतकऱ्याने पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण, मागणी मात्र पूर्ण केली नाही. तसेच खरबूजाच पीक त्यांनी लावले होते. ते पीक वाया गेले. वडील व मुलांची काळजी पाहता त्यांनी हतबल होऊन आत्महत्या Protest For Farmer केली. कर्जबाजारी किंवा व्यसनाधीन होवून ही आत्महत्या केलेली नाही," असेही आमदार खरात यांनी सांगितले.
शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे की औरंगजेबाची कबर ?
कैलास नागरे यांच्या आत्महत्या प्रकरणावरून विधान परिषदेचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील सरकारला घरचा आहेर दिलाय. मिटकरी यांनी म्हटले की, राज्यातील अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित असून यात राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्याचे प्रश्न महत्वाचे आहेत की औरंगजेबाची कबर याचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. औरंगजेबाची कबर आहे, तिथे असावी. कबर आहे ठीक आहे. पण, त्यावर डेव्हलपमेंट नको. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करून अधिवेशन काळात महाराष्ट्राचे प्रश्न दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत आणि औरंगजेबाची कबर वेगळी आहे. भातखळकर आणि राणे यांनी शिवाजी महाराजांची पुस्तक वाचावीत," असा सल्लाही आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
शेतऱ्ऱ्यांची फसवणूक सुरू आहे - दानवे
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की, शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त एका तरुण मुलाने आत्महत्या केली. पुरस्कार मिळालेले शिक्षक नागरगोजे यांनी आत्महत्या केली. त्यांना 18 वर्षे पगार मिळाला नाही. याला सरकार जबाबदार आहे. आंदोलनाची भूमिका आम्ही घेतलीय. सभागृहातही विषय मांडणार. न्यायाधीशांची खोटी सही झाल्याचा प्रकार धक्कादायक आहे. यावरून गुन्हेगारी कुठे पोहचलीय, हे लक्षात येते. तसेच कापसाला योग्य तो भाव नाही. जी परिस्थिती सोयाबीनची तिच इतर पिकांची आहे. यातून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.