Street to Assembly Aurangzeb Controversy रस्त्यांपासून विधिमंडळापर्यंत हल्लाबोल ! बजरंग दल, विहिंपचे आंदोलन ; औरंगजेबवरून महाभारत

18 Mar 2025 16:41:27
 
auragabebbb
 
मुंबई/छ. संभाजीनगर : Street to Assembly Aurangzeb Controversy एकीकडे बीड, परभणी, लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, महागाई यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतानाच आता दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) ने महाराष्ट्र सरकारकडे ती कबर लवकर काढून टाकण्याची मागणी केली आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर कबर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा गाजला. सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केल्याच्या मुद्यावरुन विधिमंडळात गोंधळ Street to Assembly Aurangzeb Controversy घातला.
 
छत्रपती संभाजीगनर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबर काढून टाकावी Street to Assembly Aurangzeb Controversy या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून सोमवारी राज्यातील जिल्हा परिषद आणि तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. सरकारने ही कबर काढून टाकावी अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विहिंपने दिला आहे. तर हिंदुत्ववादी संघटनांना दुसरे कोणतेही काम उरलेले Street to Assembly Aurangzeb Controversy नाही. त्यांनी सरकारच्या पापाची कबर खोदावी, असा घणाघात माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 
क्रूर शासकाची महाराष्ट्रात छाप का ?
 
विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र आणि गोवा प्रादेशिक मंत्री गोविंद शेंडे यांनी औरंगजेबाच्या कबरीला गुलामगिरीचे प्रतीक म्हटले Street to Assembly Aurangzeb Controversy आहे. ते म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यापूर्वी 40 दिवस त्यांचा छळ केला. अशा क्रूर शासकाची छाप महाराष्ट्रात का राहावी ?
 
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरुन गोंधळ
 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केली. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
 
विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्याने सपकाळ यांनी त्यांच्या व्यक्तिगतच नव्हे, तर महाराष्ट्राचा अपमान केला आहे. या प्रकरणी सभागृहाच्या अध्यक्षांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी किंवा सपकाळ यांना समज द्यावी. हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य तपासावे. जर त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह्य असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी देखील दरेकर यांनी केली.
 
जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने नव्या वादाला सुरुवात
 
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानामुळे वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. आव्हाड म्हणाले की, औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची म्हणजे काय करायचे ? महाराष्ट्राचीच ही माती आहे. सौंदर्यीकरण हा विषय वेगळा आहे. एकदाची ती कबर उखडा. दररोज तेच तेच बोलले जाते. इथे हजारो विषय पेंडिंग असताना केवळ औरंगजेबवर बोलले जात आहे. इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही. औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, असे आव्हाड म्हणाले.
 
रावणाला बाजूला करून रामायण सांगता येईल का, कौरवांना बाजूला करून महाभारत सांगता येईल का, अफजल खान बाजूला करून प्रतापगडाची लढाई सांगता येईल का, हिटलरला बाजूला करून दुसरे विश्व युद्ध सांगता येईल का, असे प्रश्न आव्हाड यांनी विचारले. या सर्व गोष्टीला सरकारचा एक छुपा पाठिंबा आहे, असा मोठा दावा आव्हांनी केला.
Powered By Sangraha 9.0