_202503191520512201_H@@IGHT_500_W@@IDTH_950.png)
नागपूर : Hansapuri Attack चिटणीसपार्क परिसरात दोन गट अमोरासमोर आल्यानंतर दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्ण ताकत लावली. लाठीचार्ज करून दंगलखोरांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. सांगण्यात येते की, हिंसाचार पसरवल्यानंतर दंगलखोर भालदारपुरामार्गे गीतांजली चौकात पोहोचले. त्यानंतर हंसापुरी परिसरात Hansapuri Attack विशिष्ट समाजाला लक्ष्य करून दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. स्थानिक नागरिकांनुसार जवळपास 300 ते 400 लोकांचा जमाव परिसरात दाखल झाला आणि घरांवर दगडफेक सुरू केली. त्यांच्या हातात मोठे चाकू आणि तलवारीही होत्या. काही लोकांनी काचेच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल बॉम्ब बनवून ठेवला होता. घरांवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण होते. समोरचे दृष्य पाहून त्यांच्या अंगावर शहारे आले होते. Hansapuri Attack आपण जीवंत वाचू की नाही यातही संशय असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - History Repeats In Nagpur शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास जिवंत ! असेच पेटले होते महाल
बंडू क्लिनिकमध्ये घुसून तोडफोडहंसापुरी भागात Hansapuri Attack बंडू श्रीवास यांचा हाडवैद्यचा दवाखाना आहे. येथे सर्व समाजाचे लोक उपचारासाठी येतात. पोलिसांनी दंगलखोरांना गीतांजली चौकातून पळविल्यानंतर ते हंसापुरी भागात Hansapuri Attack दाखल झाले. श्रीवास यांच्या क्लिनिकचे दार तोडून आत घुसले. त्यावेळी 5 वर्षांची चिमुकली तेथेच बसून जेवत होती. ती दंगलखोरांना पाहताच भीतीने आरडा-ओरड करू लागली. कुटुंबीयांनी कसेबसे तिला आतच्या खोलीत ओढले. दंगलखोरांनी संपूर्ण क्लिनिकमध्ये तोडफोड केली. गल्ल्यातील 40 हजारांची रोकडही लुटून नेली.
हफ्त्यांवर खरेदी केले होते वाहनहंसापुरी भागात Hansapuri Attack राहणाऱ्या शरद गुप्ता यांनी सांगितले की, त्यांनी काटकसर करून हफ्त्यांवर मुलांसाठी 2 दुचाक्या खरेदी केल्या होत्या. त्यांनी पूर्ण हफ्ते भरले असले तरी त्यांना त्यासाठी खूप परिश्रम करावे लागले. पाहता-पाहता दंगलखोरांनी दोन्ही वाहने आगीच्या स्वाधिन केले. इतकेच नाहीतर घरावर पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. सुदैवाने घराला आग लागली नाही. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.
केवळ एका समाजाला टार्गेट केलेपरिसरातच राहणारे चंद्रकांत वसंत कावळे हे गत 35 वर्षांपासून पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेसाठी देखावे तयार करतात. त्यांनी शेजारीच राहणाऱ्या गुप्ता यांच्या घरापुढे मोकळी जागा असल्याने काही बॅनर आणि देखाव्याचे साहित्य ठेवले होते. मात्र दंगलखोरांनी ते सर्व आगीच्या स्वाधीन केले. तसेच परिसरातील 9 दुचाकी वाहन आणि एक कारही पेटवली. कावळे यांनी सांगितले की, अगदी लागूनच दुसऱ्या समाजाच्या लोकांचे घर आणि दुकानही आहे. मात्र त्यांच्या घरावर एक दगडही फेकण्यात आला नाही आणि आमचे सर्व काही जाळले. सर्वात आधी घरांवरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले होते.
शिर्के गल्लीत ‘कोहराम’रात्री 8.30 वाजतापासून चिटणीसपार्क परिसरात दंगलखोर गोळा होऊ लागले. त्यापूर्वीच परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. लोक आप-आपल्या घरात दडून बसले होते. अशात परिसरात हिंसाचार पसरल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दंगलखोर मिळेल त्या मार्गाने पळाले. या दरम्यान काही दंगलखोर शिर्के गल्लीत घुसले. तेथे त्यांनी अक्षरश: हैदोस घातला. एकानंतर एक 9 चारचाकी वाहनांवर दगडफेक केली. सर्व दुचाकी वाहनांची तोडफोड केली. वाहनांवर मोठ-मोठे सीमेंटचे दगड आणि विटा फेकण्यात आल्या. अनेक घरांवर दगडफेक केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तोडण्यात आले.
मुलगी घरी पोहोचताच घेतला सुटकेचा श्वासपरिसरात राहणारी आस्था दहीकर ही महाविद्यालयीन तरुणी आहे. सायंकाळी वातावरण बिघडल्याचे समजताच आई स्वाती यांनी तिला फोन केला. लवकरात लवकर घरी येण्यास सांगितले. आस्था ऑटोरिक्षातून घराकडे निघाली, मात्र तोपर्यंत परिस्थिती चिघळली होती. चिटणीस पार्क जवळ शेकडो लोक जमले होते. दंगलखोरांनी तिचा ऑटो अडवला. आस्था घाबरली होती. आईही देवासमोर बसून मुलगी सकुशल घरी यावी म्हणून प्रार्थना करीत होती. कसी-बसी आस्था घरी पोहोचली आणि आईने सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर मात्र जो हिंसाचार सुरू झाला त्याने सर्वांच्या अंगावर शहारे आले होते.