नागपूर : History Repeats In Nagpur सोमवारी 17 मार्च रोजी नागपुरात उसळलेल्या दंगलीची चर्चा देशभर होते आहे. औरंगजेबची कबर हटवण्यावरून प्रारंभ झालेला हा वाद आता नागपूरपर्यंत येऊन पोहचला असून, सोमवारी निर्माण झालेल्या तणावात अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य लोक जखमी झालेत. History Repeats In Nagpur डझनभर वाहने जाळण्यात आली. हिंदूंच्या घरांवरही दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे नागपूरच्या महालमध्ये परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मुळात अशा घटना नागपुरात क्वचितच घडत असल्या तरी ही पहिलीच घटना म्हणता येणार नाही. कारण सुमारे 98 वर्षांपूर्वी नागपूरच्या महाल परिसरात History Repeats In Nagpur अशीच एक दंगल उसळली होती. ज्याची धग तब्बल तीन दिवस कायम होती. या घटनेत 25 जणांचा जीव गेला होता तर 180 जण जखमी झाले होते. त्या काळीही सोमवारप्रमाणे महाल परिसरात जाळपोळ झाली होती.
ती 3 दिवसांची काळरात्र
शहरात क्वचितच कोणी दोन समुदायांच्या लोकांमध्ये हिंसक संघर्ष किंवा दंगली History Repeats In Nagpur पाहिल्या असतील. पण सुमारे शंभर वर्षांपूर्वी महालमध्ये अशीच दंगल उसळल्याचे येथील लोक सांगतात. 4 सप्टेंबर 1927 रोजी झालेल्या दंगलीचा पॅटर्न सोमवारी घडलेल्या घटनेसारखाच होता. हिंदू संघटनांचे लोक देवीचीमिरवणूक काढत होते. ही मिरवणूक महाल परिसरात पोहोचली असता दुस-या समाजातील बांधवांनी ती रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा वाद झाला आणि त्याचे रक्तरंजित हिंसाचारात रूपांतर झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंदूंच्या घरांना लक्ष्य करून भीषण हिंसाचार करण्यात आला. या घटनेत एकूण 25 जणांचा मृत्यू झाला असून 180 जण गंभीर जखमी झाले होते. ही दंगल एवढी भीषण होती की, तीन दिवसांची ती काळरात्र ठरली होती.
डॉ. हेडगेवार यांच्या घरावरही हल्ला
90 वर्षांपूर्वीचा हा काळ होता जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन होऊन दोन वर्षे उलटली होती. तेव्हाही संघ स्वयंसेवकांचा एक गट लाठ्या घेऊन रस्त्यावर उतरला होता. याच दंगलीत आरएसएसचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या घरावरही मुस्लिमांकडून हल्ला झाला होता, मात्र ते त्यावेळी घरात उपस्थित नव्हते. या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या एकूण 25 जणांपैकी 13 जण संघाचे स्वयंसेवक होते.
2011 मध्ये 35 दिवसांचा कर्फ्यू
सप्टेंबर 1927 नंतर नोव्हेंबर 2011 मध्येही नागपूरच्या मोमीनपुरा भागात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. काही आरोपींनी परिसरात गोळीबार केला होता. हल्लेखोरांकडे देशी बनावटीचे चाकू आणि तलवारीसारखी घातक शस्त्रे होती. दंगलखोरांनी मोमीनपुरा परिसरात मोठा गोंधळ घातला होता. यावेळी बाबा मुस्तफाबाबत दोन धार्मिक गटांमध्ये प्रचंड मतभेद झाल्याचीही माहिती आहे. हे प्रकरणही चांगलेच तापले होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसरात 35 दिवसांची संचारबंदी लागू केली होती.