नागपूर : Major Riot Averted धार्मिक कापड जाळल्यानंतर भडकलेल्या हिंसाचारानंतर मंगळवारी शहरात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. परिसरात सशस्त्र जवानांचा चोख बंदोबस्त असून शहरातील संवेदनशील भागांत कलम 163 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने Major Riot Averted मोठी घटना टळली. अन्यथा या दंगलीत संपूर्ण शहरच जळाले असते. दरम्यान पोलिसांनी दंगलखोरांविरुद्ध 5 गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 80 जणांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. सायंकाळी पोलिसांनी संवेदनशील भागात रूटमार्च काढून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अशी विनंती केली.
सोमवारी दुपारी नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून महालच्या गांधी गेट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर धार्मिक चादर ठेवली. पायदळी तुडवल्यानंतर पुतळा जाळण्यात आला. या कृत्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल Major Riot Averted झाले. धार्मिक कापड जाळल्याने एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन तणावाची स्थिती निर्माण झाली. समाजाचे 300 ते 400 लोक गणेशपेठ पोलिस ठाण्यात पोहोचले. आरोपींना तात्काळ अटकेची मागणी करण्यात आली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देऊन त्यांना शांत केले.
सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास अचानक समाजाचे लोक चिटणीस पार्कजवळ गोळा होऊ लागले. शेकडो लोकांचा जमाव गांधी गेटकडे Major Riot Averted निघाला. पोलिसांनी तात्काळ बॅरिकेडिंग करून चिटणीस पार्क चौकात त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान दुसऱ्या गटाचे लोकही परिसरात गोळा झाले. परिस्थिती चिघळली आणि दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत सामान्य नागरिकांसोबतच अनेक पोलिस कर्मचारी व अधिकारीही जखमी झाले. दगडफेकीत वाहनांची तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली. रात्रभर पोलिस परिसरात तळ ठोकून Major Riot Averted होते. परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करीत होते. वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले, अन्यथा संपूर्ण शहरच या दंगलीत जळाले असते. स्थानिक लोकांनुसार, या दंगलीशी त्यांचा कोणताही संबंध नाही. पवित्र महिना सुरू असल्याने पोलिसात तक्रार दिल्यानंतर सर्व आप-आपल्या कामात व्यस्त झाले होते. दंगल घडवणारे बाहेरून आले होते.
व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद
मंगळवारी दिवसभर तणावग्रस्त भागातील रस्ते निर्मनुष्य होते. अनेक भागांतील व्यावसायिक प्रतिष्ठानेही बंद होती. प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता. दिवसभर पोलिसांनी डोळ्यात तेल घालून पहारा Major Riot Averted दिला. तर दुसरीकडे सोमवारच्या दंगलीत सहभागी झालेल्या युवकांना शोधून अटक करण्याचे काम सुरू होते. आतापर्यंत दंगलीशी संबंध असणाऱ्या 80 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दंगलीत सहभागी असणाऱ्यांच्या चित्रफिती प्रसारित झाल्या होत्या. दंगलखोरांच्या हातात केवळ दगडच नाहीतर तलवार, चाकू आणि काठ्याही होत्या. त्यामध्ये दिसणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन पोलिस अटकसत्र राबवित आहेत. त्यामुळे हा आकडा दोनशेवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोबतच पोलिस सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांचाही शोध घेत आहेत. पोलिसांनी 55 सोशल मीडिया अकाऊंटची यादी तयार केली आहे. त्यांच्या माध्यमातून लोकांना भडकवण्यात आले होते.
भालदारपुरा - मोमीनपुऱ्यात भीतीचे वातावरण
संचारबंदीचा आदेश लागू केल्यामुळे रस्त्यावर निघण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, अनेक जण घराबाहेर पडत होते. त्यामुळे पोलिसांनी दंड्यांचा वापर केला. पोलिसांच्या धाकामुळे सकाळपासूनच तणावग्रस्त भागातील रस्ते मोकळे होते. दुपारपर्यंत भालदारपुरा, मोमीनपुरा, चिटणीस पार्क परिसरात भीतीचे वातावरण होते. अनेक जण पोलिसांच्या दंड्यांना घाबरुन घरातील खिडकीतून डोकावून बघत होते.
शंभरावर वाहनांची जाळपोळ- तोडफोड
मोमीनपुरा, हंसापुरी, चिटणीस पार्क चौक, भालदारपुरा या भागातील जवळपास शंभरावर वाहनांची जाळपोळ-तोडफोड करण्यात आली. यामध्ये दोन जेसीबीसह, ऑटो, ई-रिक्षा आणि दुचाकींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हंसापुरीत एकाच इमारतीखालील तब्बल 18 दुचाकी जाळण्यात आल्या. तर भालदारपुऱ्यातील कार, मालवाहू वाहने, ऑटोरिक्षा आणि दुचाकी फोडण्यात आल्या. पोलिसांनी जळालेल्या दुचाकी जप्त करून आरटीओतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला.