नागपूर : PM Internship Opportunity युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2025 PM Internship Opportunity सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून उमेदवारांना खासगी संस्थांमध्ये कामाचा अनुभव मिळणार असून त्यांना रोजगारक्षम बनविण्यास मदत होईल. आपल्या करिअरला नवीन दिशा देण्यासाठी तरुणांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
इंटर्नशिपसाठी PM Internship Opportunity अर्ज प्रक्रिया आता सुरू असून 31 मार्चपर्यंत खुली आहे. नोंदणी करा, आपला प्रोफाइल तयार करा आणि विविध क्षेत्रांमधील संधींसाठी अर्ज करा. नोंदणी किंवा अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही. सहभागी 500 कंपन्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध आहे.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी PM Internship Opportunity अर्ज प्रक्रिया ऑनलाइन होईल आणि इच्छुक उमेदवार अधिकृत पोर्टलवर अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी किंवा अर्ज करण्यासाठी https://pminternship.mca.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आली.
योजनेसाठी पात्रता निकष
राष्ट्रीयत्व: अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. वय मर्यादा-अर्जदाराचे वय 21 ते 24 वर्षे (अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार) असावे. रोजगार आणि शिक्षण स्थिती- अर्जदार पूर्णवेळ नोकरीत किंवा नियमित शिक्षण घेत नसावा. मात्र, ऑनलाइन किंवा दूरशिक्षणाद्वारे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
खालीलपैकी कोणतीही पात्रता पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात –हायस्कूल (१०वी पास), उच्च माध्यमिक शाळा (१२वी पास), आयटीआय प्रमाणपत्र धारक, पॉलिटेक्निक डिप्लोमा धारक, स्नातक, पदवी जसे की बी.ए, बी.ए.ए.सी, बी.कॉम., बीसीए, बी.बी.ए., बी.फार्म पात्रता असावी.