Saturn Transit शनिदेव 29 मार्च रोजी रात्री 10 वाजून 07 मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनिच्या या राशी Saturn Transit परिवर्तनामुळे मकर राशीच्या लोकांची साडेसातीपासून मुक्तता होईल. मीन राशीमध्ये शनिचे Saturn Transit हे संक्रमण तब्बल 30 वर्षांनी होते आहे. तीन वेगवेगळ्या ग्रहांसोबत युती करत शनि देव मिथुन आणि कन्या सह अनेक राशींच्या जीवनात शानदार बदल घडवून आणणार आहेत.
वैयक्तिक जीवनासह करिअरमध्ये उत्तम प्रगती, विरोधकांचा नाश तसेच व्यवसायात मोठ मोठ्या डिल होणार आहेत. अनेक समस्यांचा अंत होणार असून तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत. जीवनात सकारात्मक बदल असेल आणि सुख समृद्धीचे योग असतील. त्या लकी राशी कोणत्या आहेत, याबाबत आज आपण जाणून घेऊया.
वृषभ : Saturn Transit राशीच्या एकादश स्थानात शनिचे संक्रमण Saturn Transit होणार आहे. यामुळे वृषभ राशीच्या लोकांना भरपूर धनलाभ होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे संबंध सुधारतील. शनिची दृष्टी तुमच्या लग्न, पंचम आणि अष्टम स्थानात असल्यामुळे समस्यांवर पटापट तोडगा सापडेल. तसेत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. दरम्यान तुम्ही काही शिक्षण घेत असाल तर त्यात थोड्या समस्या येण्याची शक्यता आहे. विशेषतः जुलै ते नोव्हेंबर दरम्यान जेव्हा शनि वक्री असणार आहे. या कालावधीत मुलांसंदर्भात काही गोष्टी अशा घडतील ज्यामुळे तुमचे टेन्शन वाढेल. थोड्या काळापुरते हे असेल नंतर सगळं काही ठिक होणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्या बढतीचे योग आहेत. व्यापारात उत्तम नऱा असून प्रवासाचा योग दिसतो आहे.
मिथुन : राशीच्या लोकांसाठी शनि दशम स्थानात Saturn Transit संक्रमण करेल. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे तो शनिचा मित्र मानला जातो. तेव्हा हे संक्रमण मिथुन राशीच्या जातकांसाठी लाभदायक असणार आहे. व्यवसायात तुमची हुशारी तुम्ही दाखवू शकाल. दरम्यान कामाचा ताण वाढतो आहे. यश मिळविण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. तुम्हाला सतत प्रयत्न करायचा आहे तर यश मिळेल. तुमचे खर्च कमी होतील पण कुटुंबात वातावरण मात्र स्थिर राहणार नाही. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान तुम्हाला आई- वडिलांच्या तब्येतीची खास काळजी घ्यावी लागेल. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होतील. व्यवसायात नियमांचे पालन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
कन्या : राशीच्या लोकांसाठी शनि सातव्या स्थानात संक्रमण करत आहे. यामुळे प्रेमविवाहाची संधी मिळू शकते. तुमच्या लवलाइफमध्ये आनंदाची बातमी मिळेल आणि विवाहाचा मार्ग मोकळा होईल. व्यापार किंवा अन्य महत्त्वाच्या कामांसाठी बॅंकांकडून कर्ज मिळू शकते. व्यावसायिक भागीदारांसोबत चांगले संबंध राखणे गरजेचे आहे. प्रवासाचा योग असून त्यात थोडा त्रास असेल पण तुमची कामे मार्गी लागणार आहेत. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान, कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे घरातील वातावरण थोडे गंभीर असेल. तुम्ही या काळात संयम आणि विवेकाने वागा.
तुळ : राशीच्या लोकांसाठी शनि सहाव्या स्थानात संक्रमण करणार आहे. ही स्थिती शुभ असून तुम्ही विरोधकांवार विजय मिळवणार आहात. व्यावसायिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. मेहनतीचे फळ मिळणार असून तुमची कामे पटापट मार्गी लागतील. तुम्ही स्पर्धेत आघाडीवर असाल. तब्येतीची काळजी घ्या आणि आहाराकडे दुर्लक्ष करू नका. व्यायाम नेहमी करा, किती ही कंटाळा आला तरी टाळाटाळ करु नका. विशेषत: जुलै ते नोव्हेंबर दरम्यान तब्येतीची खास काळजी घ्यावी लागेल.
कुंभ : राशीच्या लोकांसाठी शनिचे संक्रमण द्वितीय स्थानात होत आहे. यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी साढेसातीचा अंतिम टप्पा सुरू होईल. या कालावधीत पैसे साठवणे यावर जास्त भर द्या. तुम्हाला बचत करणे याकडे लक्ष द्यावेच लागेल. बचत वाढवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. जर तुम्ही परदेशात काम करत आहात किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत आहात, काही आंतरराष्ट्रीय व्यापार करत असाल तर हे संक्रमण तुम्हाला बंपर लाभ देणार आहे. नातेसंबंधात चढ-उतार दिसतो आहे.