Australia Women Triumph ऑस्ट्रेलियन वादळ ! न्यूझीलंडवर महिला संघाची दमदार विजयवारी

Top Trending News    22-Mar-2025
Total Views |

australia 

सिडनी : Australia Women Triumph ऑस्ट्रेलिया महिला संघाने पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा आठ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनी (75) आणि जॉर्जिया वोल (नाबाद 50) यांनी तुफानी अर्धशतके झळकावली. यासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी Australia Women Triumph घेतली आहे. 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनी आणि जॉर्जिया वोल या सलामी जोडीने स्फोटक फलंदाजी केली आणि पहिल्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. 11 व्या षटकात बेथ मुनीला बाद करून ली ताहुहूने ही Australia Women Triumph भागीदारी मोडली.
 

बेथ मुनीने 42 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. 13 व्या षटकात ली ताहुहूने फोबी लिचफिल्डला (2) बाद केले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी 13.3 षटकांत दोन गडी गमावून 138 धावा केल्या आणि सामना आठ गडी राखून जिंकला. जॉर्जिया वोलने 31 चेंडूत नऊ चौकारांसह नाबाद 50 धावा केल्या. एलिस पेरी (3) नाबाद राहिली. न्यूझीलंडकडून ली ताहुहूने दोन फलंदाजांना बाद केले.