Mumbai Indians Anthem Launch मुंबई इंडियन्सचे धमाकेदार अँथम साँग ! चाहत्यांचा उत्साह शिगेला

22 Mar 2025 14:26:38
 
MI anthem
 
मुंबई :Mumbai Indians Anthem Launch मुंबई इंडियन्सने गुरुवारी त्यांचे बहुप्रतीक्षित अँथम सॉन्ग रिलीज केले. यामध्ये एका खास कलाकाराने काम केले आहे. बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफही यात दिसत आहे. या गाण्यात जॅकी श्रॉफ मस्त अंदाजात रोहित शर्माची एन्ट्री करताना दिसत आहे. एवढेच नाही तर या गाण्याला खूप खास व्यक्तींने गायले आहे. या गाण्यात ‘मैं नहीं तो कौन बी’ मधून प्रसिद्ध झालेल्या सृष्टी तावडेने आवाज दिला आहे. या अँथम सॉन्गची Mumbai Indians Anthem Launch मुख्य ओळ आहे 'प्ले लाइक मुंबई' म्हणजेच 'मुंबईसारखा खेळ.'
 
Australia Women Triumph ऑस्ट्रेलियन वादळ ! न्यूझीलंडवर महिला संघाची दमदार विजयवारी  
 
मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2025 मध्ये पहिला सामना 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळणार आहे. रविवारी होणारा हा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. आयपीएल सुरू होण्याच्या 2 दिवस आधी, गुरुवारी, 20 मार्च रोजी संघाने आपले अँथम सॉन्ग Mumbai Indians Anthem Launch केले आहे.
 
पहिल्या सामन्यात हार्दिक नसणार कर्णधार
 
हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. या कारणामुळे तो रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. यावर संघाने अधिकृतपणे सांगितले आहे की पहिल्या सामन्यात हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव कर्णधार असेल.
 
मुंबई इंडियन्स 5 वेळा चॅम्पियन
 
आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्स सीएसकेसोबत पहिल्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघानी 5-5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मागील सिजनमध्ये अर्थात 2024 साली संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0