Nagpur Riot Mastermind Trial हायकोर्टात धक्कादायक वळण ! नागपूर दंगलीचा मास्टर माइंड चर्चेत

22 Mar 2025 13:35:46


fahim

नागपूर : Nagpur Riot Mastermind Trial सोमवारी महाल मध्ये उसळलेल्या दंगलीचा मास्टरमाईंड Nagpur Riot Mastermind Trial फहीम खान याच्यासह 50 दंगलखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणात फहीम खानला 18 मार्च रोजी अटक करून पोलीस कोठडीत पाठविण्यात आले. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला असून, त्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात Nagpur Riot Mastermind Trial अर्ज केला आहे. राजकीय दबावाखाली त्याला अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचे फहीम खानने अर्जात म्हटले आहे. याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
 
हेही वाचा - Diplomatic Strategy ट्रम्पना खूश करण्यासाठी भारताची मास्टरस्ट्रोक रणनीती !

मास्टरमाईंड ठरविण्यात आलेल्या फहीम खानने सर्वप्रथम मोठा जमाव गोळा करून गणेशपेठ ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. दंगल प्रकरणात पोलिसांनी 51 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केले असून, आरोपींमध्ये मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टीचा अध्यक्ष फहीम खान शमीम खान याचा समावेश आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेल्या आंदोलनात ‘आयत’ लिहिलेली चादर जाळल्याचा आरोप करत मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा अध्यक्ष फहीम खान शमीम खान गणेशपेठ पोलीस ठाण्यात पोहचला. त्याच्या पाठीमागे जवळपास 40 ते 50 युवकांचा जमाव होता. फहीमने गणेशपेठच्या पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आणि चादर जाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणात त्याला आश्वासन देऊन परत पाठवले. मात्र, यानंतर गांधीगेट परिसरातून फहीम खान यांच्या नेतृत्वातील युवक जात असताना त्यांनी नारेबाजी केली. त्यामुळे प्रकरण चिघळले.
 
Powered By Sangraha 9.0