Air India Mega Deal एअर इंडियाची मोठी भरारी ! 40 वाइड बॉडी विमानांच्या खरेदीची घोषणा

23 Mar 2025 17:39:03
 

air craft 
 
मुंबई : Air India Mega Deal एअर इंडिया 30 ते 40 वाइड बॉडी विमाने खरेदी करण्यासाठी बोईंग आणि एअरबसशी चर्चा करत आहे. हा करार 50 हून अधिक विमानांसाठी देखील असू शकतो. यामध्ये एअरबस ए 350 आणि बोईंग 777 एक्स मॉडेल्सचा समावेश आहे. या करारामुळे एअर इंडियाच्या Air India Mega Deal आधुनिकीकरण योजनेला बळकटी मिळेल.
 
Education Startup Synergy शिक्षण, स्टार्टअप आणि संशोधन एकत्र येऊ द्या ! अश्विनी वैष्णव यांचे आवाहन  
 
अहवालानुसार, कराराची अंतिम रूपरेषा जूनमध्ये पॅरिस एअर शोमध्ये उघड केली जाऊ शकते. एअर इंडियाने Air India Mega Deal 2023 मध्ये 470 विमानांची ऑर्डर दिली आहे. याशिवाय, गेल्या वर्षी 100 एअरबस विमानांची ऑर्डर देण्यात आली होती. तथापि, यापैकी बहुतेक विमाने सिंगल-आइसल होती. हा नवीन करार वाइड बॉडी विमानांसाठी असेल.
 
एअरलाइनने 6 लाख कोटींना 470 विमानांची ऑर्डर
 
एअर इंडियाने दोन वर्षांपूर्वी एअरबस आणि बोईंगकडून 470 विमानांची ऑर्डर दिली होती. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांच्या मते, या कराराची किंमत 70 अब्ज डॉलर (सुमारे 6 लाख कोटी) आहे. या करारानुसार, एअर इंडियाला एअरबसकडून 250 आणि बोईंगकडून 220 विमाने मिळतील.
 
एअरबस सोबतच्या करारानुसार, 40 वाइड बॉडी ए 350 विमाने आणि 210 नॅरोबॉडी सिंगल-आयल ए 320 निओस विमाने मिळणार होती. तर, बोईंगसोबतचा करार 34 अब्ज डॉलर्स (सुमारे 2.9 लाख कोटी रुपये) किमतीचा आहे. याअंतर्गत, एअर इंडियाला 190 बी 737 मॅक्स विमाने, 20 बी787 विमाने आणि 10 बी777एक्स विमाने मिळणार आहेत.
Powered By Sangraha 9.0