Cricket Saliva Ban Lifted चेंडूवर लाळ लावण्यास परवानगी ! कर्णधारांच्या सहमतीनंतर बंदी उठवली

Top Trending News    23-Mar-2025
Total Views |

cri
 
दिल्ली : Cricket Saliva Ban Lifted भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) कर्णधारांच्या सहमतीनंतर आगामी सत्रात चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला, कोरोना काळानंतर लाळेचा वापर पुन्हा सुरू करणारी आयपीएल ही सर्वांत पहिली मोठी स्पर्धा ठरली Cricket Saliva Ban Lifted आहे. शनिवारपासून सुरू होणान्या आयपीएलच्या आगामी सत्राच्या आधी मुंबईत कर्णधारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लाळेवरील बंदी हटवण्यात आली आहे. सर्वाधिक कर्णधार या निर्णयाच्या बाजूने होते. काही कर्णधारांना लाळेचा वापर पुन्हा सुरु करण्याबाबत साशंकता होती. काही कर्णधार तटस्थ राहिले पण सर्वाधिक कर्णधारांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शविला.
 
 
कधी घातली होती बंदी ?
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कोरीनाकाळात खबरदारी म्हणून चेंडूला चकाकी आणण्यासाठी वापरात येणाऱ्या लाळेवर बंदी घातली होती. वर्षांनुवर्षे सुरू असलेला हा प्रकार 2022 मध्ये कायमचा बंद करण्यात आला. कोरोनानंतर आयपीएलने ही आयसीसी निर्बंधांचा स्पर्धेत समावेश केला होता. परंतु, त्याची मार्गदर्शक तत्त्वे खेळाच्या प्रशासकीय मंडळाच्या कक्षेबाहेर आहेत.