मुंबई : Foreign Investment Boom परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात परतले असून त्यांनी पुन्हा खरेदी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी तेजी नोंदवली. सेन्सेक्स 557 अंकांनी वाढून 76,905 वर बंद झाला. तर निफ्टी 50 निर्देशांक 159 अंकांच्या वाढीसह 23,350 वर स्थिरावला.
सेन्सेक्स- निफ्टीची कमकुवत सुरुवात झाली होती. पण परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री Foreign Investment Boom कमी करुन खरेदीवर जोर दिल्याच्या आशावादामुळे दोन्ही निर्देशांकांनी तेजीच्या दिशेने चाल केली. क्षेत्रीय पातळीवर कंझ्यूमर ड्युरेबल्स आणि मेटल वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. ऑईल आणि गॅस, मीडिया, टेलिकॉम हे निर्देशांक प्रत्येकी 2 टक्क्यांनी वाढले. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस Foreign Investment Boom प्रत्येकी 1 टक्के वाढले. बीएसई मिडकॅप 1.1 टक्के आणि स्मॉलकॅप 2 टक्के वाढला.
सेन्सेक्सवर एनटीपीसी, बजाज फायनान्स, कोटक बँक, नेस्ले इंडिया, सन फार्मा, टाटा मोटर्स, एलटी, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड हे शेअर्स 1 ते 3 टक्के वाढले. तर इन्फोसिस, एम अँड एम, टाटा स्टील, टायटन हे शेअर्स प्रत्येकी 1 टक्के घसरले. निफ्टीने गेल्या चारही सत्रांत वाढ नोंदवली आहे. निफ्टीची ही सात आठवड्यांतील सर्वात चांगली कामगिरी आहे. आजच्या वाढीसह या आठवड्यात निफ्टी सुमारे 4 टक्के वाढला.
परदेशी गुंतवणूकदार खरेदीकडे वळले
'एनएसई'वरील आकडेवारीनुसार, 20 मार्च रोजी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा निव्वळ खरेदीदार बनले. त्यांनी एका दिवसात 3,239.14 कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विक्रीवर जोर राहिला. त्यांनी 3,136 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. यंदा आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी 1.65 लाख कोटींच्या शेअर्सची विक्री केली. तर देशातंर्गत गुंतवणूकदारांनी 1.85 लाख कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.