Reservation Controversy संविधानाच्या मूल्यांना तडा ? धर्माच्या आधारे आरक्षणाचा नवा वाद

Top Trending News    24-Mar-2025
Total Views |

rss 
बंगळुरू :  Reservation Controversy राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा रविवारी समारोप झाला. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी पत्रपरिषद घेऊन या तीन दिवसीय बैठकीचे निष्कर्ष प्रसार माध्यमांसमोर मांडले. यावेळी त्यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सरकारी कंत्राटात मुस्लिमांना दिलेल्या 4 टक्के आरक्षणावरुन भाष्य केले.
 
होसबळे म्हणाले, भारतीय राज्यघटनेनुसार धार्मिक आधारावर आरक्षण Reservation Controversy देता येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनाही हे नको होते. कोणतेही सरकार असे करत असेल, तर ते बाबासाहेबांच्या हेतूविरुद्ध काम करत आहे. एकेकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही धर्माच्या आधारावर आरक्षणाची Reservation Controversy घोषणा केली होती. पण नंतर सुप्रीम कोर्टाने त्याची अंमलबजावणी होऊ दिली नाही, असेही ते यावेळी म्हणाले. आपल्या समाजात जाती आणि समुदायाच्या आधारावर भांडणे होऊ नयेत. जेव्हा कोणी खेळात पदक जिंकतो किंवा सीमेवर सैनिक शहीद होतो तेव्हा आपण त्याचा धर्म किंवा जात बघत नाही. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो, असे होसबळे म्हणाले.
 
 
औरंगजेब वादावर होसबळे यांनी सांगितले की, आपण बाहेरून येणाऱ्यांना आदर्श बनवायचे की स्थानिकांना आदर द्यायचा, याचा विचार करायला हवा. औरंगजेबाने जे काही केले, त्याबद्दल त्याला आयकॉन मानले जाऊ शकत नाही. दिल्लीत एक औरंगजेब रोड होता, त्याचे नाव अब्दुल कलाम रोड करण्यात आले. यामागे काही कारणे होती. औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोहला कोणीही नायक बनवले नाही. 'गंगा-जमुना' संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी कधीच दारा शिकोहला पुढे आणण्याचा विचार केला नाही. आपण भारतीय संस्कृतीच्या विरोधात असलेल्या व्यक्तीला आपला आयकॉन बनवणार Reservation Controversy की, या देशाची संस्कृती, परंपरा आणि मातीशी नाळ असलेल्या लोकांना ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
भाजपाध्यक्ष निवडीत हस्तक्षेप नाही
 
भाजप अध्यक्षांसाठी प्रचारक पाठवण्याचा आमचा हेतू नाही. सर्व संस्था स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीनुसार अध्यक्ष निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. यात आम्हाला काहीही विचारण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरणही होसबळे यांनी दिले. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर देश चांगले काम करत आहे. आपण सरकारच्या कामाचे दररोज मूल्यांकन करत नाही; जनता निवडणुकीच्या वेळी मूल्यांकन करते.
 
कार्यकर्त्यांना थांबवणार नाही
 
सीमांकनाबाबत होसबळे म्हणाले, जनगणना सुरू होऊ द्या. सीमांकनही होऊ द्या, त्यानंतर आपण पाहू. जर संघाच्या कोणत्याही व्यक्तीला किंवा कार्यकर्त्याला गुणवत्तेच्या आधारावर राजकारणी म्हणून नियुक्त केले गेले तर त्यात काहीही गैर नाही. यामध्ये संघाची कोणतीही भूमिका नाही. भाजपाच नव्हे, तर इतर संघटनांनीही मागितले तर आम्ही त्यांना प्रचारक देऊ. कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून थांबवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.