Digital Bhakti संत तुकाराम गाथा डिजिटल युगात ! शिर्डीत संत साहित्य संमेलनाचा भव्य समारोप

25 Mar 2025 13:05:20

digital
 
शिर्डी : Digital Bhakti संत आणि वारकऱ्यांच्या नम्रता व शालीनतेच्या शिकवणुकी नुसार राज्य शासन वाटचाल करत असून, संत तुकारामांची गाथा डिजिटल Digital Bhakti स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल शासनाने उचलले आहे. गाथेतील साडेचार हजार अभंग नामवंत गायकांच्या आवाजात स्वरबद्ध करून दृकश्राव्य माध्यमातून सादर केले जाणार असल्याची माहिती राज्याचे मराठी भाषा Digital Bhakti व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
 
वारकरी साहित्य परिषद आयोजित 13 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या Digital Bhakti समारोप प्रसंगी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष हभप संजय महाराज देहूकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, हभप निवृत्ती महाराज नामदास, हभप चकोर महाराज बावीस्कर, हभप श्रीकांत गणेश राजा (तामिळनाडू), हभप कृष्णा महाराज शिऊरकर (कर्नाटक), हभप उद्धव महाराज कुकुरमुंडेकर (गुजरात), हभप चैतन्य महाराज कबीर उपस्थित होते.
 
 
केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, असे सांगतानाच उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, बहिणाबाई यांच्या साहित्यातून मराठी अभिजात भाषेचे दर्शन घडते. वारकरी संप्रदाय ही आपली संस्कृती आहे. वारकऱ्यांची परंपरा व किर्तन गावोगावी पोहोचविण्यासाठी वारकरी साहित्य संमेलनांचे Digital Bhakti ग्रामीण भागात आयोजन होणे गरजेचे आहे. संत साहित्य गावागावांत पोहोचले तर इंग्रजीच्या प्रभावात घट होऊन मराठीबद्दल प्रेम वाढणार आहे. महाराष्ट्रात राहणार्‍या सर्वांनी मराठीचा सन्मान केला पाहिजे. मराठी भाषा विभागाचे कार्यक्षेत्र आंतरराष्ट्रीय आहे. जगात 17 बृहन्महाराष्ट्र मंडळे आहेत. येत्या काळात या मंडळांची संख्या वाढवून 50 करण्यात येणार आहे. संत साहित्याचे श्रेष्ठत्व जगाला कळावे यासाठी परदेशातही संत संमेलन भरविण्याची गरज आहे. राज्य शासन वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून संत साहित्य संमेलनासाठी दरवर्षी 15 लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली.
 
कोळेकर म्हणाले, महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा टिकविण्यात संत, वारकऱ्यांचे अमूल्य योगदान आहे. हभप नामदास महाराज, श्रीकांत गणेश राजा, कृष्णा महाराज शिऊरकर, उद्धव महाराज कुकुरमुंडेकर, चैतन्य कबीर महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.
 
वारकरी विठ्ठल पुरस्कार प्रदान
 
उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते वारकरी विठ्ठल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये हभप वै.भाऊसाहेब महाराज पाटील (निपाणी, कर्नाटक), हभप वै. पांडुरंग महाराज काजवे (कोगनोळी, कर्नाटक) व हभप वै. बाळासाहेब भारदे (माजी विधानसभा अध्यक्ष) यांच्या वारसांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. वारकरी संप्रदायात विशेष कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार हभप गोपाळ महाराज गोसावी यांना जाहीर झाला. त्यांच्यावतीने हभप माधव महाराज शिवणीकर यांनी या पुरस्काराचा स्विकार केला. याप्रसंगी महाराज यांचे वंशज हभप निवृत्ती महाराज नामदास यांना चारचाकी वाहन प्रदान करण्यात आले.
 
Powered By Sangraha 9.0