नागपूर : Korea Ticket Obsession सीताबर्डी येथील इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर काल, रविवारी दुपारी तीन वाजता एक 13-14 वर्षांची मुलगी तिकीट खिडकीवर पोहोचली. तिने भेदरलेल्या अवस्थेत दक्षिण कोरियाचे तिकीट मागितले. कर्मचाऱ्यांनी नाकारले. तिने पुन्हा अट्टाहास केल्याने Korea Ticket Obsession स्टेशनवरील अधिकारी, कर्मचारी सारेच गोंधळले. अखेर इतर अधिकारी आले, तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी वेगळीच बाब पुढे आली. ही मुलगी आई-वडिलांशी वाद झाल्याने सेलू येथून घर सोडून आली होती.
अधिकाऱ्यांनी पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर तिला साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर जायचं असल्याचे पुढे आले. ही मुलगी एकटीच असल्याने काही बरे वाईट होईल, या भितीने अधिकाऱ्यांनी तिला स्टेशनवर Korea Ticket Obsession बसवून सेलू पोलिसांना फोन लावला. अन् काही वेळत तिचे आई-वडील तिला घेण्यासाठी आले. अन् मुलगी सुखरुप मिळाल्याने आनंदाने घरी परतले. महामेट्रोच्या स्टेशनवरील अधिकाऱ्यांमुळे या मुलीची आई-वडिलांशी पुन्हा भेट झाली. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी येथील अधिकाऱ्यांचे आभार मानले. आजच्या काळात एकटी मुलगी म्हणजे धोकादायकच, ही बाब येथील अधिकाऱ्यांनी हेरली. मुलीने चुकीच्या स्टेशनचे Korea Ticket Obsession नाव घेतले नसते तर काय झाले असते, याची कल्पना देखील भयावह असल्याचे येथील अधिकाऱ्याने नमूद केले.
सर्वांचीच उडाली भंबेरी
काल दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही मुलगी आपल्याच विचारात हरवलेली दिसून आली. तिकिट खिडकीजवळ येऊन तिने दक्षिण कोरियाचे तिकीट मागितले अन् सारेच अवाक झाले. अधिकाऱ्यांनी तिला वारंवार समजावले की महामेट्रो फक्त नागपूरमधील प्रवासासाठी आहे. पण ती ऐकायला अजिबात तयार नव्हती, त्यामुळे सर्वांचीच भंबेरी उडाली. काहीतरी गडबड असल्याचे समजायला अधिकाऱ्यांना वेळ लागला नाही. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन आत कार्यालयात बसवून घेतले. तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. अधिकाऱ्यांनी मुलीला दिलासा दिला आणि तिची वैयक्तिक माहिती घेतली. तिच्या सांगितलेल्या माहितीमुळे उपस्थित सर्वांना धक्का बसला.
ही मुलगी वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील असून आई-वडिलांसोबत छोटासा वाद झाल्यानंतर ती कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून आली होती. त्यानंतर ती सीताबर्डी मेट्रो स्टेशन वर पोहोचली होती. मुलीचे सर्व ऐकल्यानंतर वरिष्ठ मेट्रो अधिकाऱ्यांनी सेलू पोलिसांशी संपर्क साधला. सेलू पोलिस ठाण्यात तिच्या हरविल्याची आई-वडिलांनी आधीच तक्रार दाखल केली गेली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर, सेलू पोलिस ठाण्याचे अधिकारी मुलीच्या आई-वडिलांना कळवून त्यांना घेऊन ते सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर पोहोचले आणि त्यांच्या मुलीला पाहून ते अत्यंत आनंदित झाले.