Deshmukh Murder Conspiracy देशमुख हत्या प्रकरणामागे मोठा कट ? ॲड. उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट

Top Trending News    27-Mar-2025
Total Views |

ujjawal
 
बीड :  Deshmukh Murder Conspiracy मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची बुधवारी बीड येथील मकोका न्यायालयात सुनावाणी पार पडली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात युक्तिवाद केला. हत्याकांडाच्या संपूर्ण घटनेला वाल्मीक कराडने गाईड केले, असे उज्ज्वल निकम म्हणाले. त्यांनी सीडीआरचा महत्त्वाचा मुद्दाही कोर्टापुढे मांडला व आरोप निश्चित करण्याची मागणी केली. आजच्या सुनावणीवेळी आरोपींना व्हीसीद्वारे न्यायालयात हजर Deshmukh Murder Conspiracy करण्यात आले. त्यानंतर अॅड्. निकम यांचा युक्तिवाद झाला. आरोपींच्या वकिलांनी काही कागपत्रांची मागणी करीत आरोप निश्चितीला विरोध केला. आता पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे. सुनावणीनंतर अॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.
 
 
संतोष देशमुख हत्या Deshmukh Murder Conspiracy प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. संतोष देशमुख हत्या Deshmukh Murder Conspiracy प्रकरणात 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.
 
प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा
 
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख Deshmukh Murder Conspiracy यांचा खून एका मोठ्या कटाचा परिपाक आहे. हा कट कसा शिजला हे तारखेप्रमाणे न्यायालयाला सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे, असा देखील दावा न्यायालयात केला. विशेषत: वाल्मीक कराडने ज्याप्रमाणे धमकी दिली, त्याप्रमाणे गँग लीडर सुदर्शन घुले तिथे प्रत्यक्ष आला. सुदर्शन घुलेने देखील धमकीचा पुनरुच्चार केला. या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आहेत, अशी माहिती सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.
 
आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी निवेदन
 
हा कट दोन किंवा दोघांपेक्षा अधिक आहेच, परंतु हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत. यातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचाही गुन्ह्यात सहभाग कसा आहे, याबाबत आम्ही न्यायालयाला विषद केले. काही महत्त्वाच्या साक्षीदारांची ओळख गोपनीय ठेवावी, अशी न्यायालयाला विनंती केली आहे. आरोपींची संपत्ती संघटित गुन्हेगारी कायद्याखाली जप्त करावी, अशीही विनंती न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयात अर्ज केलेले आहेत, अशी माहिती वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
तपास अधिकारी आणि माझे सहकारी अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी आरोपींच्या वकिलांना लागणाऱ्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली. आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यांनुसार ही घटना 8 ऑक्टोबर 2024 पासून ते 9 डिसेंबर 2024 संतोष देशमुखांची निर्घृण हत्या होईपर्यंत या घटनेची मालिका न्यायालयात विषद केली. प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमच्याजवळ पुरावा आहे. यातील संघटीत गुन्हेगारी कशी फोफावली गेली? आणि यातील म्होरक्या सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता, हे देखील न्यायालयात स्पष्ट केले. आरोपींना हवी होती, ती सर्व कागदपत्रे देण्यात आलेली आहे. सुनावणीची पुढील तारीख 10 एप्रिल ठेवली आहे. त्यादिवशी आम्ही न्यायालयाने आरोपींवर कोणकोणते गुन्हे करावेत, चार्ज फ्रेम करावा, याबाबतचा विनंती अर्ज देणार आहोत, असे अॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
 
आरोपीच्या वकिलांची मागणी
 
ज्या कागदपत्रांवर सरकारची भिस्त होती, विशेषत: सीसीटीव्ही फुटेज, त्याचप्रमाणे सीडीआर, आरोपींची 7 डिसेंबर 2024 रोजी एका हॉटेलमध्ये झाली, त्यासंदर्भातले सर्व कागदपत्रांची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणीसाठी दिलेल्या धमकीचे ऑडिओ कॉल्सचे रेकॉर्डिंग न्यायालयात दाखल केले आहे.