Mughal Descendant Vs Fadnavis मुघल वंशजाची राष्ट्रपतींकडे धाव ! पत्राद्वारे केली फडणवीसांची तक्रार

27 Mar 2025 11:36:13

vanshaj
 
 मुंबई :  Mughal Descendant Vs Fadnavis औरंगजेबाच्या कबरीचा विषय वादात सापडला आहे. आता मुघल वंशज प्रिंस याकूब हबीबुद्दीन यांनी औरंगजेबच्या कबरीसाठी राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीसांवर टीका देखील केली आहे. मुघल वंशज प्रिन्स हे औरंगजेबच्या कबरीचे काळजीवाहक आहेत. औरंगजेबाच्या Mughal Descendant Vs Fadnavis कबरीचं संरक्षण करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
 
 
वंशज प्रिंस याकूब हबीबुद्दीनन यांनी म्हटले की, औरंगजेबाच्या कबरीचे जे काही वाद सुरू आहे. त्याबद्दल आम्ही राष्ट्रपतींना पत्र पाठवले आहे. प्रिन्स याकूब यांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेबच्या कबरीला हटवणे, काढणे किंवा काही नुकसान पोहोचवणे हे कायद्याच्याविरोधात आहेत. आता औरंगजेबच्या कबरी मुद्दावर प्रिन्स याकूब यांनी उडी घेतल्याचे बघायला मिळते आहे. अनेकांकडून ही कबर काढून टाकण्याची मागणी ही सातत्याने केली जातंय. या पत्रातून प्रिन्स याकूब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केल्याची माहिती मिळतेय.
Powered By Sangraha 9.0