नागपूर : Nagpur Stabbing बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले या अधिवेशन विशेषतः गाजले ते नागपूर शहरात झालेल्या महाल परिसरात झालेल्या जातीय दंगलीच्या विषयावर. हे शहर मुख्यमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे नागपुरातील सुरक्षा व्यवस्था ही आटोक्याबाहेर कशी असे अनेक प्रश्न अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाकडून उपस्थित करण्यात आले. बुधवारी एकीकडे अधिवेशनाचे सूप वाजत असतानाच नागपुरात अशी घटना घडली जी सुरक्षा व्यवस्थेवर असंख्य प्रश्नचिन्ह Nagpur Stabbing उपस्थित करणारी ठरली. नागपुरातल्या इमामवाडा जाटतरोडी परिसरात दिवसाढवळ्या पोलीस ठाण्यासमोरच एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या Nagpur Stabbing करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून तरुणाने साथीदारासोबत मिळून तरुणीच्या वडिलांचा भररस्त्यावर जीव घेतला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांचे जराही भय उरले नाही का असा प्रश्न या घटनेवरून निर्माण होतो आहे.
पोलिस चौकीसमोरच हे हत्याकांड घडल्याने Nagpur Stabbing पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तसेही गत काही काळापासून शहरात कायदा-सुव्यवस्थाच अस्तित्वात नसल्याचे सातत्याने दिसून आले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा सारख्या गंभीर गुन्ह्यात वाढ झाली आहे. यावरून गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीतीच Nagpur Stabbing नसल्याचे दिसून येत आहे. नरेश वाल्दे (53) रा. जाटतरोडी असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी नीतेश उर्फ नाना मेश्राम आणि ईश्वर उर्फ जॅकी सोमकुवर दोन्ही रा. रामबाग यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेश पेंटिंगचे काम करीत होते. पत्नी, 3 मुली आणि अर्धांगवायूने ग्रस्त आईसोबत परिसरात राहात होते. बुधवारी दुपारी नरेश यांना कोणाचा तरी फोन आला. त्यानंतर ते दुचाकीने घराबाहेर पडले.
जाटतरोडी पोलिस चौकीसमोर दुचाकीवर असलेल्या नाना आणि जॅकीने त्यांना अडविले. शिवीगाळ करीत चाकूने हल्ला केला. पोट आणि डोक्यावर वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले आणि पळून गेले. भररस्त्यात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. नरेश यांना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली. दिवसाढवळ्या भररस्त्यावर खुनाची घटना घडल्याने लोकांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. नाना आणि जॅकी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे नोंद झाले आहेत. पोलिसांनी नरेशच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू केली आहे.
नरेशच्या मुलीवर होते एकतर्फी प्रेम
नाना नरेशच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. रस्त्याने येता-जाताना तो तिला त्रास देत होता. नरेश यांनी त्याला विरोध करीत मुलीपासून दूर राहण्यास बजावले होते. त्यामुळे नानाने नरेश आणि कुटुंबीयांना धमकीही दिली होती. त्यानंतर मुलगी नोकरीनिमित्त शहरातून बाहेर गेली. काही दिवसांपूर्वीच ती परतली होती. नाना तिच्याशी पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. याबाबत समजताच नरेशने त्याला फटकारले होते. त्यामुळे नाना चिडलेला होता. माहिती मिळाली आहे की, मंगळवारी रात्री काही लोकांनी नरेशच्या घरावर दगडफेकही केली होती. त्यांनी याबाबत इमामवाडा पोलिसात तक्रारही केली होती आणि बुधवारी दुपारी त्यांची हत्या झाली.