Modi In Nagpur नागपूरचा मेकओव्हर ! मोदींच्या दौऱ्यापूर्वी विकासकामांना गती

28 Mar 2025 16:00:35

pm
 
नागपूर : Modi In Nagpur मागील कित्तेक महिन्यांपासून शहारत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. यातील अनेक कामे प्रशासनाच्या अनास्थेमुळे रखडलेली आहेत. आता या रखडलेल्या कामांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे गती मिळाली आहे.  
 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Modi In Nagpur रविवार ३० मार्च रोजी नागपूर शहरातील विविध ठिकाणी भेट देण्यात आहेत. त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने शहरात सुरू असणाऱ्या विविध विकासकामांना गती मिळाली आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी Modi In Nagpur एक दिवसाच्या दौऱ्यावर शहरात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे रेशीमबाग, दीक्षाभूमी येथे भेट देणार आहेत. नंतर ते हिंगणा मार्गावरील माधव नेत्रालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याच्या मार्गावर सुरू असलेली कामे दोन दिवसात पूर्ण करण्याचे अल्टिमेटम मनपा प्रशासनाने दिले आहे. उद्यान विभागामार्फत चौकांमधल्या फुलांची सजावट केली जात आहे. तर ज्या चौकांमध्ये सौदार्यीकरणाची कामे सुरू आहेत अशी कामे वेळीस पूर्णत्वास घेऊन जाण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय इतर मार्गावरील अर्धवट खोदुन ठेवलेले रस्ते देखील बुजविण्यात येत आहेत.
 
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या आढाव्या दरम्यान मनपाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना दोन दिवसत कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त विमानतळावर ते रेशीमबाग स्मृती मंदिर आणि रेशीमबाग ते दीक्षाभूमी मार्गावरील मोठ्या चौकांच्या सौदार्यीकरण केले जात आहेत. याशिवाय सध्य:स्थितीत सुरू असलेली रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करण्यावर अधिक भर दिला जात आहे. मनपाकडून स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने विशेष सोय केली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0