मुंबई : Uddhav Against Government मोदी सरकार या ईदला 'सौगत-ए-मोदी' ही नवीन योजना सुरू करत आहेत. यानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशभरातील मुस्लिम बांधवांना मोठी भेट देण्यात येत आहे. यावरून ठाकरे यांनी हे 'सौगत ए मोदी नाही, सौगत ए सत्ता' असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारची स्थिती ही 'खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा', अशी असल्याची टीका उद्धव ठाकरे Uddhav Against Government यांनी सत्ताधारी सरकारवर केली आहे. मुंबईत गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, शिवरायांचा अपमान करणारा सोलापूरकर अजून मस्तीत फिरतोय. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील Uddhav Against Government शाळा संचालक आपटेवर अद्याप कारवाई नाही ? मात्र कॉमेडियन कुणाल कामराने गद्दारावर टीका केली की लगेच कारवाई. मग महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी ? असा सवाल त्यांनी केला.
हे मोदींचे निर्लज्ज उदाहरण
आम्हाला जेव्हा मुस्लिम मते मिळाली तेव्हा यांचे डोळे पांढरे झाले होते. मात्र बोगस हिंदुत्ववादी किंवा बुरसटलेले लोक आहेत. त्यांना सौगात ए मोदींचे निर्लज्ज उदाहरण दिसले आहे. 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा देणारे सौगात देत आहेत. राज्यपालांच्या भाषणात नेहमी माझे सरकार असा उल्लेख असतो. भाजपने हिंदुत्त्व कधीच सोडले आहे. आता 'सौगात ए सत्ता' हेच भाजपचे ध्येय असल्याचे ठाकरे Uddhav Against Government म्हणाले. भाजपचा बहुसंख्यांक सेल सणानिमित्त काही मागणार नाही का ? असा सवालदेखील ठाकरे यांनी केला.
आता सभापतींवर अविश्वास ठराव आणावा लागेल का ?
सरकारकडून केवळ योजनांच्या घोषणा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, मात्र आता बहिणींमध्ये वर्गवारी केली जाते. सरकार यावर काही बोलत नाही. शेतकऱ्यांच्या मुद्यावर निवडणूक लढवली आणि आता शेतकऱ्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी सरकार सगळ्यांच्या गठाभेटी घेत जाणार, अशी शक्यतादेखील ठाकरे Uddhav Against Government यांनी व्यक्त केली. त्यामुळे सभापतींवर पहिल्याच अधिवेशनात अविश्वास ठराव आणावा लागेल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
शिंदे सेनेकडे कुठलाच पर्याय नाही
सरकारने नीट उत्तरे दिली असती तर मला बोलण्याची वेळ आली नसती. ज्या समाजात विष पेरले त्याच समाजात सरकार अन्न धान्य वाटत आहे. हे लोक दडपशाही हे करत आहेत. मी त्यांना शिवसेना मनात नाही. शिवसेना एकच आहे, शिंदेंची शिवसेना ही गद्दारांची आहे. त्यांच्याकडे बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेवर केली.