Gudi Padwa Celebration असा साजरा करा गुढीपाडवा, उघडा समृद्धीचे मार्ग !

29 Mar 2025 10:08:53

gudi
 
Gudi Padwa Celebration गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस संकल्प, नवा उत्साह आणि पारंपरिक पद्धतींनी सण साजरा करण्याचा दिवस आहे.

१. गुढी उभारणे (गुढीपूजन)
 
गुढी Gudi Padwa Celebration ही विजय, समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक मानली जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा गच्चीत ती उभारली जाते.
 
गुढी उभारण्याची पद्धत:
 
एका बांबूच्या काठीवर कपडा (साडी किंवा धोतर) गुंडाळून त्यावर सोन्याचा भास होणारा तांब्या किंवा लोटा ठेवावा.
गुढीला Gudi Padwa Celebration हळद-कुंकू, गंध, फुलं, आंब्याची आणि कडुलिंबाची पाने, साखरेची गाठी लावाव्यात.
गुढीला पुष्पहार घालून तिला वंदन करावे आणि नैवेद्य दाखवून पूजा करावी.
 
गुढी उभारल्याने Gudi Padwa Celebration घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुभता येते, असे मानले जाते.
 
Miraculous Power of Ram Naam रामनाम जपल्याने होणारे अद्भुत फायदे तुम्हालाही आश्चर्यचकित करतील !  
 
२. सूर्योदयाच्या वेळी स्नान व नवी वस्त्रे परिधान करणे
 
सकाळी तेल लावून स्नान करावे.
नवीन किंवा पारंपरिक कपडे परिधान करावेत.
स्त्रिया नऊवारी साडी, मुली लहंगा-चोली, पुरुष पायजमा-कुर्ता किंवा धोतर परिधान करतात.
 
३. कडुलिंबाची पाने खाणे
 
कडुलिंब, गूळ आणि जिरे यांचा मिश्रण खाण्याचा प्रघात आहे.
हे आरोग्यास चांगले असून नवीन वर्ष सुखकर जावो, संकट दूर होवोत, असा भाव त्यामध्ये असतो.
कडुलिंबाची कडवट चव आणि गूळ यांचे मिश्रण जीवनात गोड-तिखट अनुभव येतात, पण आपण दोन्ही स्वीकारायला हवे, हे शिकवते.
 
४. पारंपरिक पूजा विधी
 
गुढीपुढे दीप प्रज्वलित करून गंध, फुलं, धूप, नैवेद्य अर्पण करावा.
रामरक्षा स्तोत्र, रामनाम, गणपती अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, नववर्ष शुभाशिष मंत्र पठण करावे.
गुढीपाडवा हा प्रभू श्रीरामाच्या राज्याभिषेकाचा दिवस मानला जातो, त्यामुळे श्रीरामाचे नामस्मरण करणे शुभ मानले जाते.
 
५. घराची व परिसराची स्वच्छता व रांगोळी काढणे
 
घर स्वच्छ करून मुख्य दरवाजावर आंब्याची आणि कडुलिंबाची तोरणे बांधावी.
सुंदर रांगोळी काढून सणाचे स्वागत करावे.
 
Saturns Mysterious Influence जाणून घ्या शनीचे संक्रमण आणि इतिहासातील गूढ रहस्ये ! वैयक्तिक जीवनावरील प्रभाव  
 
६. पारंपरिक पद्धतीने भोजन
 
गुढीपाडव्याला खास पारंपरिक पदार्थ केले जातात.
गोडधोड पदार्थ : श्रीखंड-पुरी, पुरणपोळी, गुळाच्या पोळ्या, वरण-भात, गोड खीर
तिखट पदार्थ : बटाट्याची भाजी, मसालेभात
या सर्व पारंपरिक पद्धतींचे योग्य प्रकारे पालन केले तर, तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचे मार्ग खुलतील.
 
 
Powered By Sangraha 9.0