Modi In Nagpur नागपुरात मोदींच्या दौऱ्याला लागणार होते गालबोट, पोलिसांनी मध्यरात्री केली मोठी कारवाई

30 Mar 2025 09:59:18

modi in
 
नागपूर - Modi In Nagpur पंतप्रधान Narendra Modi आज नागपूर शहरात येणार असल्याने सर्वत्र उत्साहाची लाट आहे. संपूर्ण शहर BJP च्या आणि भगव्या झेंड्यांनी सजविण्यात आले आहे. जागोजागी पंतप्रधानांच्या स्वागताचे होल्डिंग उभारण्यात आले आहेत. शहराच्या काही चौकांमध्ये मोदींचे Modi In Nagpur चाहते आणि भाजपाचे कार्यकर्ते स्वागत देखील आहेत. साधारणतः निम्म्या शहरात मोदींचा Modi In Nagpur दौरा होणार आहे. सकाळी नऊच्या सुमारास विमानतळावर पोहोचलेले मोदी संघ मुख्यालय असलेल्या संघ संस्थापक डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात त्यांच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर दीक्षाभूमी येथे दर्शन घेतील. त्यानंतर संघाची संस्था असलेल्या माधव नेत्रालयाच्या भव्य रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होतील. व नंतर संरक्षण क्षेत्रात अग्रणीय कामगिरी करणाऱ्या सोलर एक्स्प्लोसिव्हच्या प्लांटला भेट देतील. सकाळी 9 वाजता नागपुरात आलेले मोदी Modi In Nagpur साधारणतः 3.30 पर्यंत शहरात राहणारा असल्याने मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी 5000 पोलिसांचा ताफा नागपूर शहरात तैनात करण्यात आला आहे.
 
महत्त्वाचे म्हणजे वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरणाऱ्या नेत्यांनी मोदींना भेटण्याची वेळ मागितली होती. ही वेळ न मिळाल्याने विदर्भवादी नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विदर्भवादी नेत्यांनी नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखविण्याची देखील तयारी दर्शवली होती. परिणामी शहराची प्रतिमा खराब होणार नाही या दृष्टीने संपूर्ण मोदी दौऱ्यामध्ये शहर पोलिसांसह राज्याचा गृह विभाग कष्ट घेत असताना विदर्भवाद्यांनी काळे झेंडे दाखविणे ही दुर्भाग्य पूर्ण बाब ठरणार होती. हे लक्षात येताच शहर पोलिसांकडून मध्यरात्री विदर्भवाद्यांच्या घराचे दरवाजे ठोठविण्यात आले. त्यांची धरपकड करण्यात आली. साधारणतः 3.45 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. विदर्भवादी नेतांना पोलिसांच्या नजरेत ठेवण्यात आले आहे. एकंदरीतच मोदींच्या दौऱ्याला कुठेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून धरपकड सत्र सुरू असून, संशय निर्माण होईल तेथे पोलिसांकडून कारवाई केल्या जाते आहे.
Powered By Sangraha 9.0