Modi In Smriti Mandir Nagpur संघ शताब्दीचा सुवर्णयोग : स्मृति मंदिरात पंतप्रधान मोदींचा मंगल ठसा !

30 Mar 2025 10:22:59

modi 2
नागपूर - Modi In Smriti Mandir Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर असून, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. स्मृती मंदिरात Modi In Smriti Mandir Nagpur त्यांनी संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार आणि माधव सदाशिव गोळवलकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सरसंचालक डॉ. मोहन भागवत, भैय्याजी जोशी आणि हेडगेवार स्मारक समितीचे सदस्य त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान म्हणून मोदी Modi In Smriti Mandir Nagpur प्रथमच RSS मुख्यालयात आले आहेत. यापूर्वी, अटलबिहारी वाजपेयी यांनीही पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात संघ मुख्यालयाला भेट दिली होती. सध्या आरएसएस आपल्या शताब्दी वर्षाचा उत्सव साजरा करत आहे. याआधी पंतप्रधान आणि सरसंघचालक अयोध्येत रामलालच्या अभिषेकावेळीही ते दोघे सोबत होते. आरएसएस आपल्या शताब्दी वर्षाचा उत्सव साजरा करत असताना पंतप्रधान मोदींची रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक मंदिराला दिलेली भेट देशभर चर्चेत आहे.
 
 
स्मृती मंदिरात काही वेळ घालवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा दीक्षाभूमीकडे रवाना होईल, जिथे ते 15 मिनिटे थांबतील. दीक्षाभूमी हे ठिकाण आहे, जिथे 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या भेटीसाठी ट्रस्टने संपूर्ण तयारी केली असून, यापूर्वीही पंतप्रधानांनी दीक्षाभूमीला भेट दिली आहे.
यानंतर पंतप्रधान थेट माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनासाठी जातील, जिथे ते सुमारे दीड तास उपस्थित राहतील. माधव नेत्रालय केंद्राच्या पायाभरणी समारंभाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. यावेळी डॉ. मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी, गोविंद गिरी महाराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असतील. हे नेत्रालय 5.83 एकर क्षेत्रात पसरलेले असून, 5 लाख चौरस फूट जागेत 250 खाटांची सुविधा, 14 ओपीडी आणि 14 मॉड्यूलर ओटी असतील.
Powered By Sangraha 9.0