नागपूर : Korotkar Shocking Disclosure छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला Korotkar Shocking Disclosure मदत करणाऱ्या पाच जणांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नागपुरातील प्रशिक पडवेकर आणि धीरज चौधरी (चंद्रपूर) यांच्यासह हिफाजत अली, राजेंद्र जोशी (दोघेही रा. इंदूर) आणि साईराज पेंटकर अशी नोटिस बजावलेल्या युवकांची नावे आहेत. चौकशीदरम्यान या व्यक्तींचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग आढळल्यास त्यांना सहआरोपी म्हणून घोषित करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कोरटकर Koratkar Shocking Disclosure वादात सापडल्यानंतर नागपुरातून फरार झाला होता. तो चंद्रपूरातील हॉटेल सिद्धार्थमध्ये आश्रय घेत असताना त्याला नागपुरातील काही लोकांनी मदत केली होती. यामध्ये त्याच्या प्रवासाची व्यवस्था करणे, आर्थिक मदत पुरवणे आणि तेलंगणात पलायन करण्यासाठी वाहन उपलब्ध करून देणे या गोष्टींचा समावेश आहे. पोलिस तपासात ही माहिती उघड झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी संबंधित पाच जणांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे.
आलीशान कार जप्त
दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी नागपुरात छापा टाकून कोरटकरची Korotkar Shocking Disclosure आलिशान कार जप्त केली आहे. तसेच त्याच्या मित्राची गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे, एका पोलिस अधिकाऱ्याच्या खासगी वाहनाचा वापर कोरटकरने लपण्यासाठी केल्याची चर्चा आहे. या पोलिस अधिकाऱ्याचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात नागपुरातील आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी नागपुरातील काही इतर लोकांचीही माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. चौकशीदरम्यान आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.