Maharashtra Kesari Champion वेताळ शेळके ठरला महाराष्ट्र केसरी ! शरद पवारांच्या हस्ते मिळाली चांदीची गदा

31 Mar 2025 17:05:06
 
mahar
 
अहिल्यानगर : Maharashtra Kesari Champion अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी ठरला Maharashtra Kesari Champion आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेताळ शेळके याने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला. वेताळला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली. यावेळी जयंत पाटील, खासदार नीलेश लंके आदी उपस्थित होते. विजेता वेताळ शेळके याला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली. वेताळ हा सोलापूरचा आहे. कर्जत जामखेडमध्ये ही स्पर्धा पार पडली.
 
 
अहिल्यानगरमधील कर्जत शहरात आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे Maharashtra Kesari Champion आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला. त्यामध्ये मोळी डाव वापरून पृथ्वीराज पाटीलने शिवराज राक्षेचा पराभव केला. तर सोलापूरच्या वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये अकोल्याच्या प्रशांत जगतापचा पराभव केला होता.
 
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील अंतिम लढतीच्या निकालावरून चांगलाच गोंधळ झाला होता. शिवराज राक्षेने पंचांना मारलेल्या लाथेवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Powered By Sangraha 9.0